Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कुटुंबियांना यायचे धमकीचे फोन', इतक्या महिन्यांनंतर कनिका कपूरने शेअर केला कोरोनाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 16:43 IST

कनिका कपूर ही पहिली सेलिब्रेटी आहे जिला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर ही पहिली सेलिब्रेटी आहे जिला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. कोरोनातून बरी झाल्यानंतर बऱ्याच महिन्यांनंतर तिने तिचा अनुभव शेअर केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिने सांगितले की, असे होणे म्हणजे तिच्या कुटुंबीयांसाठी आणि लंडनमध्ये असणाऱ्या मुलांसाठी मोठा धक्का होता.

कनिका कपूरने सांगितले की, आपल्या कुटुंबाला आणि मुलांना ती ४ महिने पाहू शकली नाही. तिच्या कुटुंबाला धमकीचे फोन आणि मेसेज येत होते. यातील काही तर तिला जीवे मारण्याची भाषाही करत होते.

मी खूप मजबूत आहे. मात्र मी माझ्या आजूबाजूला जे काही पाहिले त्यामुळे मी खूप घाबरले होते. चुकीच्या स्टोरींनी मला खूप दुखावले.पुढे कनिका म्हणाली, मी दीर्घकाळ काही प्रतिक्रिया दिली नाही. कारण मला नव्हते माहित की, काय प्रतिक्रिया देऊ. लोकांच्या वार्ता ऐकून वाटत होते की, कोणीच माझे ऐकणार नाही.

कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येणारी ती बॉलिवूडची पहिली सेलिब्रेटी होती. मार्च महिन्यात तिने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. त्यानंतर देशभरात खूप खळबळ माजली होती. त्यानंतर कनिका जवळपास महिनाभर रुग्णालयात दाखल होती आणि त्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली होती. 

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्या