‘सुल्तान’साठी सहा तास सलग शुटींग करताना मला अनेकदा उचलून जमिनीवर आपटलं जायचे. शूट संपल्यानंतर मी जेव्हा रिंगच्या बाहेर पडायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचे’, हे सलमानचे वक्तव्य चांगलेच वादग्रस्त ठरले. सिंगर सोना महापात्रा हिने सलमानच्या या वक्तव्यावर कडक शब्दांत टीका केली होती. यानंतर सोनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सलमानच्या चाहते बिभत्स कमेंट करीत आहेत. खुद्द सोनाने तिच्या फेसबुक पोस्टवरून ही माहिती दिली. सलमानवर टीका केल्यानंतर गत ४८ तासांत मला सतत धमक्या मिळत आहेत. यापैकी एक हजारांवर बलात्कार करण्याच्या धमक्या आहेत. मला नग्न व अश्लील फोटो पाठवले जात आहे. यावरून आपल्या समाजात किती विष पसरले आहे, हे दिसते. हे विष केवळ सलमानचे चाहते, फॉलोअर्स वा प्रेक्षकांकडूनच नाही तर सलमानचे मित्र व मीडियाकडूनही पसरवले जात आहे. इतक्या खाल्याच्या स्तराला जावून अश्लिल वागणाºयांना, आक्षेपार्ह वक्तव्य करणाºयांना कुठलीही शिक्षा मिळत नाही. चुकांमधून शिकवण्याऐवजी अशा काही लोकांना आणखी प्रोत्साहन दिले जात आहे आणि त्यांना गुडविल एम्बेसिडर बनवले जात आहे, असे सोनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
Follow