Join us

'या' अभिनेत्याच्या मदतीसाठी धावून आले तिन्ही खान !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 8:18 AM

इंडस्ट्रीतील सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खानच्या मैत्रिचे किस्से तर प्रसिद्ध आहेत. पण पुन्हा एकदा हे तिन्ही खान ...

इंडस्ट्रीतील सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खानच्या मैत्रिचे किस्से तर प्रसिद्ध आहेत. पण पुन्हा एकदा हे तिन्ही खान चर्चेत आले आहे आणि या मागचे कारण आहे इरफान खान. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता इरफान खान सध्या  न्यूरो इंडोक्राईन ट्युमर नामक आजाराशी लंडनमध्ये झुंज देतो आहे. त्याचा ‘ब्लॅकमेल’हा चित्रपट याच आठवड्यात रिलीज होतो आहे. याकठिण परिस्थिती तीनही खानने त्याला मदतीचा हात पुढे केला आहे. ब्लॅकमेलच्या प्रमोशनसाठी तीनही खान एकत्र येणार आहेत ही माहिती चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव देवने दिली आहे.   अभिनव देवने आमिर खानच्या डेली बेली चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार या तिघांसाठी ब्लॅकमेलचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे. ज्यानंतर हे तिनही खान मिळून चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. 2014मध्ये एका चॅनेलच्या कार्यक्रमाच्या दरम्यान हे तिघे एकत्र आले होते.त्यानंतर आता ब्लॅकमेलच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. सोशल मीडियावर इरफानच्या आजारावरून विविध अफवा फसरविल्या जात आहेत. त्यातीलच एक अफवा म्हणून या आजारावर मात करण्यासाठी तो आयुर्वेदिक उपचार घेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या वृत्तास अद्यापपर्यंत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. आता इरफानच्या प्रवक्त्याकडून ही माहिती खोटी असल्याचा खुसाला करण्यात आला. ALSO READ :  लंडनमध्ये उपचार घेत असलेल्या इरफान खानने शेअर केली काळजाला भिडणारी कविता...!'ब्लॅकमेल' हा एक कॉमेडी आणि थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात इरफान देव नामक व्यक्तिरेखा साकारताना दिसतोय. स्वत:वर बेतलेला प्रसंग मित्राला कहाणी म्हणून ऐकवणारा देव ट्रेलरमध्ये दिसतो. एकदा सरप्राईज म्हणून देव आॅफिसमधून लवकर घरी परततो. पण पत्नीला प्रियकरासोबत पाहून त्यालाच धक्का बसतो. यास्थितीत त्याला दोन मार्ग सुचतात. एक म्हणजे, पत्नी व तिच्या प्रियकराला ठार मारायचे किंवा दोघांनाही ब्लॅकमेल करायचे. तो ब्लॅकमेल करण्याचा मार्ग निवडतो आणि पत्नीच्या प्रियकराला १ लाख रूपये देण्याचा मॅसेज पाठवतो. इरफानशिवाय दिव्या दत्ता, किर्ती कुल्हारी, अरूणोदय सिंह यात लीड रोलमध्ये आहेत. येत्या ६ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतो आहे.