जागतिक संगीत महोत्सवाला उदयपूर येथे लवकरच सुरूवात होणार आहे. हा महोत्सव १५ ते १७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यामध्ये २० देशांमधील १५० कलाकार सहभागी होणार आहेत. सर्व प्रकारच्या संगीत प्रेमींना हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे.
यावर्षी १५ ते १७ फेब्रुवारी, २०१९ दरम्यान तलावांच्या सुंदर शहरामध्ये भारताचा सर्वात मोठा जागतिक संगीत कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीत स्पेन, इटली, फ्रान्स, क्यूबा, ब्राझिल, भारत यांसारख्या २० देशांमधील १५० प्रख्यात कलाकारांची उपस्थिती दिसून येईल. दरवर्षी ५०,००० हून अधिक लोक या महोत्सवासाठी उपस्थित राहतात. या महोत्सवात अतुलनीय असे लाईव्ह परफॉर्मन्सेस होतील आणि सर्वोत्कृष्ट अशा सांस्कृतिक विविधतेचे दर्शन होईल.तीन प्रेक्षणीय स्थळांवर होणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध संगीताचे सादरीकरण होणार आहे जे विविध मनाच्या विविध तरल भावनांचा उत्सव साजरा करेल. यामध्ये तलावाच्या काठावर अगदी पहाटेच्या ध्यानासाठी असणारा राग तसेच दुपारी प्रणयाची भावना दर्शविणारे संगीत यांचा समावेश आहे. संध्याकाळचे व्यासपीठ उत्साही तरुणाईच्या संगीताने सज्ज असेल जे सर्व वयोगटांतील लोकांना एकत्र आणेल. तसेच या महोत्सवामध्ये राजस्थानमधल्या स्थानिक प्रतिभांचेसुद्धा दर्शन होणार आहे,