बॉलिवूड स्टार्सशी संबंधित अनेक किस्से अनेकदा समोर येतात, मग ते त्यांच्या मैत्रीचे असोत किंवा दुश्मनीच्या. आतापर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यातील कॉल्डवॉरचे किस्से समोर आले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की एकदा अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)ने ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan)ला 'आंटी' म्हटले होते.
2009 मध्ये सोनम एका ब्युटी ब्रँडची अॅम्बेसेडर बनली होती आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) अनेक वर्षांपासून या ब्रँडशी जोडलेली होती आणि अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली होती. जेव्हा सोनम (Sonam Kapoor)शी याबद्दल बोलले गेले तेव्हा रिपोर्ट्सनुसार, सोनमने ऐश्वर्याला आंटी म्हटले होते आणि ऐश्वर्या राय दुसऱ्या पिढीची आंटी असल्याचे म्हटले होते. जेव्हा सोनमला असे म्हटल्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हटली की, ऐश्वर्याने माझ्या वडिलांसोबत काम केले आहे आणि सोनमसाठी तिला आंटी म्हणणे नैसर्गिक आहे.
मात्र, नंतर सोनमने या वृत्तांचे खंडन केले आणि हे सर्व केवळ गॉसिप असल्याचे सांगितले. इतकंच नाही तर सोनमने दावाही केला आहे की, ती ऐश्वर्याला कधीही 'आंटी' म्हणणार नाही. दोघांच्या वयात 11 वर्षांचा फरक आहे.
यानंतर 2011मध्ये फ्रान्सच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्यासोबत सोनम कपूरला रॅम्पवॉक करायचे होते, मात्र ऐश्वर्याने सोनमसोबत वॉक करण्यास नकार दिला. आणि म्हणाली की जर सोनमला तिच्यासोबत स्टेज शेअर करण्याची परवानगी असेल तर ती रॅम्पवर चालणार नाही.