आमिर खान व अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ या आगामी चित्रपटाकडे सगळ्यांचे डोळे लागले असताना रिलीजआधीच या चित्रपटाने वाद ओढवून घेतला आहे. होय, उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’चा निर्माता, दिग्दर्शक व आमिर खान यांच्याविरोधात जातीविशेष संदर्भ वापरून भावना दुखावल्यापकरणी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. हंसराज नामक एका वकिलाने हे प्रकरण दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वी निषाद समाजाच्या लोकांनी जिल्हाधिकाºयाच्या माध्यमातून राष्ट्रपतीला निवेदन सोपवत, या चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची व मल्लाहआधीचा फिरंगी शब्द हटविण्याची मागणी केली होती. आता या चित्रपटात जातीविशेष संदर्भ वापरून भावना दुखावल्याचा दावा हंसराज चौधरी यांनी केली आहे. त्यांनी याप्रकरणी निर्माता आदित्य चोप्रा, दिग्दर्शक विजय कृष्णा, आमिर खान याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाचा टीआरपी वाढण्यासाठी, नफा कमवण्यासाठी जाणीवपूर्वक असे करण्यात आल्याचा दावाही चौधरी यांनी केला अहे. चित्रपटाची कथा केवळ कानपूर जिल्ह्याची आहे, असे असताना चित्रपटाचे शीर्षक ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ ठेवणे मेकर्सचा हेतू दर्शवतात. चित्रपटात आमिरला फिरंगी मल्लाह संबोधित करण्यात आले आहे. याला विरोध होईल आणि याचा फायदा चित्रपटास होईल, हे मेकर्स जाणून होते. यासाठी सगळे हेतुपुरस्सर करण्यात आले, असाही त्यांचा आरोप आहे.‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला रिलीज होतोय. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ वादात, आमिर खानविरोधात प्रकरण कोर्टात!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 10:25 AM