बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या टायगर ३ (Tiger 3) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सलमानने या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुलाखती देखील देत आहे, ज्यामध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत.
नुकतेच एका मुलाखतीत सलमान खानने सांगितले की, त्याला कशाची सर्वात जास्त भीती वाटते. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याचा खुलासा केला आहे. मुलाखतीत सलमान खानला विचारण्यात आले की, त्याला सर्वात जास्त कशाची भीती वाटते? याला उत्तर देताना भाईजानने मन जिंकून देणारे उत्तर दिले. सलमानने सांगितले की, ''त्याला सर्वात जास्त आदराची भीती वाटते. एखाद्याला निराश करण्याची भीती वाटते.''
भाईजान म्हणाला की, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या नजरेतून मला आदर कमी करायचा नाही, मग ते कुटुंब असो, मित्र असो किंवा चाहते. मला फक्त याच गोष्टीची भीती वाटते, मला इतर कशाचीही भीती वाटत नाही.''
सलमान घरी ओपन थिएटर उघडणार?लवकरच आपल्या घरात एक ओपन थिएटर सुरू करण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा अभिनेत्याने केला. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच सलमानचा टायगर ३ रिलीज झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीही झळकले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात ४०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानंतर आता भाईजान टायगर वर्सेस पठाण या चित्रपटात दिसणार आहे.