बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा 'टायगर 3' (Tiger 3) दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होत आहे. चाहत्यांचा उत्साह तर गगनात मावेनासा झालाय. सलमानही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच 'टायगर 3' च्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमानने चाहत्यांशी संवाद साधला. तसंच त्याने सकाळी ६ च्या पहिल्या शोचा उल्लेख करत स्वत:चीच खिल्ली उडवली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत कतरिना कैफ म्हणते की 'टायगर ३3 मधून तिने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. दरम्यान जेव्हा होस्ट सांगतो की सिनेमाचा पहिला शो सकाळी ६ वाजता आहे तर यावर सलमान जोरजोरात हसायला लागलो आणि म्हणतो, '६ वाजताचा शो आहे ते ठीक आहे मी पकडेन पण ना ७ नंतरची फ्लाईट पकडली जाते ना ही फिल्म.' सलमानच्या या प्रतिक्रियेनंतर सगळे हसायला लागतात.
यशराज फिल्म्सच्या टायगर फ्रँचायझीची ही तिसरी फिल्म आहे. तसंच यामध्ये वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सची झलक आहे. यामध्ये शाहरुख खान 'पठाण' बनून आणि हृतिक रोशन 'वॉर' चा कबीर बनून टायगरची मदत करताना दिसणार आहेत. मनिष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' चा रन टाईमही मेकर्सने वाढवला आहे.