Join us  

​‘टायगर जिंदा है’ लोकेशन्ससाठी अली अब्बास जफर पोहोचला मोरोक्कोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2017 7:28 PM

Tiger Zinda Hai Shoot To Take Off In Morocco ; दिग्दर्शक अली अब्बास जफर याने ट्विटरवर लिहिले. ‘शुक्रवारची नमाज मोरोक्कोच्या मराकेश येथे. ‘टायगर जिंदा है’चे लोकेशन शोधण्याची उलटी गणना सुरू’. अलीने यापूर्वी सलमानचा ‘सुल्तान’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कबीर खान दिग्दर्शित करीत असलेल्या ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटानंतर सलमान खान ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनच्या निवडीसाठी दिग्दर्शक अली अब्बास जफर मोरोक्को येथे गेला आहे. अलीने आपल्या ट्विटर अकाऊंटहून त्याने ही माहिती शेअर केली असून, हे स्थळ निश्चित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ हा २०१२ साली रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल आहे.  या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर याने ट्विटरवर लिहिले. ‘शुक्रवारची नमाज मोरोक्कोच्या मराकेश येथे. ‘टायगर जिंदा है’चे लोकेशन शोधण्याची उलटी गणना सुरू’. अलीने यापूर्वी सलमानचा ‘सुल्तान’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या सोबतच त्याने ‘टायगर जिंदा है’चे पोस्टर देखील शेअर केले आहे. यात सलमान खानचा फोटो दिसतो आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख याच पोस्टरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. या वर्षाच्या शेवटी ख्रिसमसच्या पूर्वी २२ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात एका एजेंटची कथा आहे. तो एका पाकिस्तानी एजेंटच्या (कॅटरिना कैफ) प्रेमात पडतो. यावर्षी सलमान खानचा कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या फोटो क बीर खान आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करीत असतात. या चित्रपटात सलमान अशा व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान उशीरा होते. }}}}