Koffee with Karan season 5: मध्ये दिसणार टायगर आणि जॅकी श्रॉफ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 7:17 AM
कॉफी विथ करणच्या या आठवड्यात टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ आपल्याला दिसणार आहेत. बॉलिवूडमधील पिता-पुत्राची ही जोडी एकदम हटके ...
कॉफी विथ करणच्या या आठवड्यात टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ आपल्याला दिसणार आहेत. बॉलिवूडमधील पिता-पुत्राची ही जोडी एकदम हटके आहे. टायगरच्या सवयी जॅकी श्रॉफ पेक्षा खूप वेगळ्या आहेत. फिटनेसच्याबाबती, सकाळी लवकर उठणे असो किंवा रात्री वेळेवर झोपणे असे या सगळ्याच्या बाबतीत टायगर खूपच जागरुक असतो. टायगर रात्री 10 ला झोपून सकाळी 6 वाजता उठतो. एकढे सगळ्या सवयी वेगळ्या असतानाही. टायगर आणि जॅकी श्रॉफमध्ये जबरदस्त ट्युनिंग आहे. कॉफी विथ करणमध्ये टायरगने वडिलांनाबरोबरच्या बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. टायगर लहान असताना जग्गू दादा शूटिंगसाठी मुंबईच्या बाहेर जरी असेल तरी ती रोज रात्री टायगरला झोपवण्यासाठी शूटिंग संपल्यावर घरी यायचे. शूटिंग मग ते दिल्लीतो असे किंवा उटीत जग्गू दादा रात्री घरी यायचे आणि दुसऱ्यादिवशी सकाळी परत शूटिंगच्या ठिकाणी जायचे. यावेळी टायगने म्हणला शाळा ते कॉलेजच्या दरम्यान त्याची कोणीही गर्लफ्रेंड नव्हती. जॅकी म्हणाला टायगरला या सगळ्या गोष्टी करायला वेळ नव्हता. टायगर म्हणाला माझा स्वभाव खूप लाजरा होता. त्यामुळे मी कोणाशी जास्त कोणाशी बोलायचो नाही. शाळेतला मला श्रद्धा कपूर सिनिअर होती आणि माझ श्रद्धा कपूरवर क्रश होते. टायगर यावेळी त्याच्या आणि दिशा पटानीच्या नात्याबाबत देखील बोला. बॉलिवूडमध्ये माझे खूप सिलेक्टेड मित्र-मैत्रिणी आहेत. दिक्षा पटानी माझी चांगली मौत्रिण आहे. म्हणून मी आणि दिशा खूप वेळ एकत्र घालवतो. टायगरने हिरोपंती चित्रपटाच्याव्दारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. टायगरला जॅकी श्रॉफ आपले वडील असल्याचा गर्व आहे असे ही तो या शो दरम्यान म्हणाला.