टायगर-श्रद्धा डान्स लाईक शम्मीजी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 09:23 IST
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे दोघेही उत्तम डान्सर्स आहेत.
टायगर-श्रद्धा डान्स लाईक शम्मीजी...
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे दोघेही उत्तम डान्सर्स आहेत. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक चित्रपटांमध्ये ते किती चांगले डान्सर्स आहेत हे दाखवून दिले आहे. टायगरने ‘हिरोपंती’ आणि श्रद्धाने ‘एबीसीडी २’ मध्ये ते दाखवून दिले आहे.ते आता एकत्र ‘बाघी’ मध्ये दिसतील. चित्रपटाचे दुसरे गाणे ‘लेट्स टॉक अबाऊट लव्ह’ हे रिलीज करण्यात आले आहे. या रॉक एन रोल नंबरचे स्टेप्स संपूर्णपणे शम्मी कपूर यांच्या डान्स स्टाईलवर आधारित आहेत.लाल रंगाच्या कपड्यात श्रद्धा एकदम हॉट दिसत असून टायगरही एकदमच कूल बॉय दिसतोय. जणूकाही ते दोघे शम्मी कपूरला त्यानिमित्ताने श्रद्धांजली देत आहेत. हे गाणे पाहिल्यानंतर नक्कीच प्रेक्षक ६० व्या दशकात जातो. ">http://