Join us

हृतिकनंतर आता अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफचा मेट्रो प्रवास; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 3:08 PM

टायगर श्रॉफ आणि 'गणपत' चित्रपटाचा निर्माता जॅकी भगनानी यांनी मेट्रोने प्रवास केला.

अभिनेता टायगर श्रॉफचा 'गणपत'  हा चित्रपट  २० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे टायगर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत होता. 'गणपत' हा चित्रपट जबरदस्त असल्याचे सांगितले जातंय. यातच टायगर श्रॉफ आणि 'गणपत' चित्रपटाचा निर्माता जॅकी भगनानी यांनी मेट्रोने प्रवास केला. त्यांचा या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शहरातील एका दुर्गा पंडालला जाण्यासाठी टायगर आणि  जॅकी भगनानीनेमेट्रोने प्रवास केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये  टायगर आणि जॅकी हे दोघेही गप्पा मारताना दिसत आहेत.  यावेळी टायगर व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि गॉगलमध्ये दिसला. त्याच्या या जबरदस्त लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. तर जॅकी भगनानी ऑल ब्लॅक लूकमध्ये होता.

अभिनेत्री हेमा मालिनी आणि हृतिक रोशननेदेखील काही दिवसांपुर्वी मेट्रोने प्रवास केला होता. आता टायगर श्रॉफ मेट्रोत आल्याचे पाहून काही जणांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर काहींचा आनंद गगनात मावेनासा झालाय.  एका युजरने म्हटले, 'हृतिक रोशनची कॉपी करत आहे'. तर एकाने म्हटलं, 'चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा हा योग्य मार्ग आहे'. तर आणखी एका युजरने लिहलं, 'आता हे कोणते नवीन नाटक आहे?'. 

टायगर श्रॉफचा 'गणपत' चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत.  पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या गणपत चित्रपटात टायगर श्रॉफसोबत क्रिती सेनॉन आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'गणपत'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी केवळ 2 ते 3 कोटींची कमाई केली आहे.

टॅग्स :टायगर श्रॉफजॅकी भगनानीबॉलिवूडसिनेमामुंबईमेट्रो