Join us

कुटुंबासोबत मुंबईत इतक्या आलिशान घरात राहतो टायगर श्रॉफ, पाहा त्याचे घर आतून कसं दिसतं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 12:33 PM

गेल्या वर्षी टायगरने मुंबईत सी फेसिंग अपार्टमेंटही खरेदी केले आहे.

टायगर श्रॉफची ओळख ही चित्रपट जगतात अॅक्शन हिरो अशी आहे. टायगरचा वाढदिवस २ मार्चला आहे. लहानपणी त्यांचे नाव 'जय हेमंत श्रॉफ' असे ठेवण्यात आले होते, मात्र जेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हा त्यांचे नाव 'टायगर' ठेवण्यात आले. लहानपणापासून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणारा टायगर त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी सार्वजनिक करत नाही. टायगर श्रॉफने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून शालेय शिक्षण घेतले. 'हिरोपंती', 'बागी' आणि 'वॉर' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता दिसला आहे. चला तुम्हाला त्याच्याशी संबंधित आणि त्याच्या कमाईबद्दल काही रंजक गोष्टी सांगतो...

2014मध्ये केला डेब्यूसुरुवातीच्या काळात टायगरला खेळ आणि मार्शल आर्ट्स आणि डान्समध्ये इंटरेस्ट  होता. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र, नंतर त्यांनी अभिनयात करिअर केले. टायगरचा पहिला चित्रपट हिरोपंती हा 2014 मध्ये आला होता. टायगरने अल्पावधीतच लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

पहिल्या चित्रपटानंतर लोकांनी टायगरला खूप ट्रोल केले. काहींनी टायगर श्रॉफच्या गुलाबी ओठांची आणि काहींनी त्याला गर्ल लूक म्हणत खिल्ली उडवली, मात्र नंतरही टायगरने स्वत:ला अॅक्शन हिरो म्हणून सिद्ध केलं. तो एक चांगला डान्सरही आहे. टायगर मायकल जॅक्सनचा खूप मोठा चाहता आहे. स्टंटसोबतच त्याने आपल्या चित्रपटांमध्ये नृत्यकौशल्यही दाखवले आहे. 2014 मध्ये त्याला तायक्वांडोमध्ये 'ब्लॅक बेल्ट' देण्यात आला होता.

टायगर श्रॉफची संपत्तीटायगरची एकूण संपत्ती 80 कोटी रुपये आहे, तो एका चित्रपटासाठी सुमारे 8 कोटी मानधन घेतो. जाहिरातींसाठी 4 ते 5 कोटी रुपये घेतो. टायगरकडे BMW 5 सीरीज, रेंज रोव्हर, जग्वार आहे. ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. याशिवाय त्यांनी गेल्या वर्षी मुंबईत सी फेसिंग अपार्टमेंटही खरेदी केले आहे. याआधीही त्यांच्याकडे कोटींचे दोन फ्लॅट होते.

टॅग्स :टायगर श्रॉफबॉलिवूड