Join us  

Tiger Shroff: अ‍ॅक्शन सीनदरम्यान टायगर श्रॉफसोबत घडला मोठा अपघात, Video बघून चाहत्यांची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 1:21 PM

व्हिडीओ पाहिल्यानंतर टायगरचे चाहते त्याच्यासाठी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे अनेकजण तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करतायेत.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ(Tiger Shroff) ने वडील जॅकी श्रॉफ(Jackie Shroff)  यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपट जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज टायगर हा त्याच्या दमदार अॅक्शन सीन्ससाठीही प्रसिद्ध आहे. टायगर श्रॉफ त्याच्या चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक धोकादायक स्टंट करताना दिसतो. कधी त्याच्या डान्स मूव्ह्समुळे तर कधी धोकादायक फायटिंग सीन्समुळे तो अनेकदा चर्चेत राहतो. मात्र, आता असाच सीन करताना टायगरला अपघात झाला आहे.

नुकताच टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एकीकडे त्याचे चाहते अभिनेत्यासाठी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे अनेकजण त्याच्यासाठी प्रार्थना करतानाही दिसले.

काय आहे पूर्ण प्रकरण? व्हिडिओमध्ये टायगर अॅक्शन सीन अंतर्गत वॉश बेसिन तोडताना दिसत आहे. मात्र, हा स्टंट करताना अभिनेत्याचा पाय मोडला. टायगरच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओमध्येही त्याला होणारी वेदना स्पष्टपणे जाणवू शकते.व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काँक्रीट वॉश बेसिन तोडताना माझा पाय तुटला. मला वाटले मी हे करु शकेन. मी स्वतःला त्याच्यापेक्षा बलवान समजत होतो पण माझ्या बचावात बेसिनही तुटला.

अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर टायगर श्रॉफ लवकरच क्रिती सेनन(Kriti Sanon)सोबत 'गणपत' चित्रपटात आणि नंतर अक्षय कुमार(Akshay Kumar)सोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :टायगर श्रॉफसेलिब्रिटी