टायगर श्रॉफ तरूणाईमध्ये चांगलाच फेमस आहे. त्याची फीमेल फॅन्स फॉलोईंगही भरपूर आहे. त्याने इन्स्टाग्रामवर 'Ask Me Anything' सेशनदरम्यान फॅन्सना काही प्रश्न विचारण्यास सांगितले. आणि या प्रश्नांची उत्तरे टायगरने दिली. टायगरच्या एका फॅनने त्याला लग्नासाठी विचारलं. यावर टायगरने मनाला भिडणारं असं उत्तर दिलं.
टायगरने इन्स्टाग्राम हॅंडलवर लिहिले होते की, हे फार दिवसांपासून पेंडींग आहे. फॅन्स त्याला काही विचारू शकतात आणि तो लगेच उत्तर देईल. यावर लोकांनी त्याला अनेक प्रश्न विचारले आणि टायगरने सोशल मीडियावर ते पोस्टही केलेत. एका यूजरने त्याला पहिल्या क्रशबाबत विचारलं तर त्यावर टायगर त्याची हिस्ट्री टीचर असं म्हणाला.
तेच एका फॅनने त्याला विचारले की, तू माझ्याशी लग्न कर, यूकेला ये. टायगरने या प्रश्नाचं फारच जबरदस्त उत्तर दिलं. त्याने लिहिलं की, कदाचित काही वर्षांनंतर, जेव्हा मी तुझा सपोर्ट करू शकेन, तोपर्यंत खूप शिकायचंय आणि कमवायचंय.
टायगरने या सेशनमध्ये त्याच्याबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जसे की, एका यूजरने विचारले की, तू सनस्क्रीन लावतो का? यावर तो म्हणाला की, नाही, पण त्याची आई नेहमी त्याला हे सांगत राहते. तेच अडिक्शनबाबत त्याने सांगितले की, आपला परिवार आणि जीवनाशिवाय त्याला त्याचं काम आणि ट्रेनिंग फार आवडतं.