बॉलिवूडच्या नव्या पिढीचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ सध्या यशाच्या शिखरावर आहे. गतवर्षी ‘बागी 2’सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर टायगर यंदा ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’ सारखा बिग बजेट चित्रपट घेऊन येणार आहे. यासोबतचं अन्य एका चित्रपटात हृतिक रोशन व त्याची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही चित्रपट आत्ताच हिट मानले जात आहे. साहजिकचं टायगरची ख्याती विदेशातही पोहोचली आहे आणि त्याचमुळे टायगरकडे अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. यापैकी एखाद-दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारण्याचा विचार टायगरने केला होता. पण अचानक त्याने आपला हा विचार बदलला. कारण काय, तर पापा जॅकी श्रॉफ .
अन् पापा जॅकी श्रॉफ यांच्यामुळे टायगर श्रॉफने बदलला इतका मोठा निर्णय!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 10:33 IST
हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारण्याचा विचार टायगरने केला होता. पण अचानक त्याने आपला हा विचार बदलला. कारण काय, तर पापा जॅकी श्रॉफ .
अन् पापा जॅकी श्रॉफ यांच्यामुळे टायगर श्रॉफने बदलला इतका मोठा निर्णय!!
ठळक मुद्देतूर्तास बॉलिवूडमध्ये टायगरचे अनेक प्रतिस्पर्धी आहेत. टायगर हॉलिवूडमध्ये बिझी झाला तर बॉलिवूडचे हे प्रतिस्पर्धी कितीतरी दूर निघून जातील. जिथे त्यांना गाठणे कदाचित टायगरला शक्य होणार नाही.