Join us

Ganapath Teaser: ‘ये तो बवाल है...!’ टायगर श्रॉफच्या ‘गणपत’चा टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 6:16 PM

Tiger Shroff, Ganapath Teaser: बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ लवकरच पडद्यावर धमाकेदार ॲक्शन करताना दिसणार आहे. होय, टायगरचा ‘गणपत’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येतोय. काही तासांपूर्वी टायगरने या चित्रपटाचा टीझर शेअर केला.

Ganapath Teaser:  बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ (Tiger Shroff) लवकरच पडद्यावर धमाकेदार ॲक्शन करताना दिसणार आहे. होय, टायगरचा ‘गणपत’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही तासांपूर्वी टायगरने या चित्रपटाचा टीझर शेअर केला. शिवाय चित्रपटाची रिलीज डेटही सांगितली. टीझरमध्ये टायगर नेहमीप्रमाणे ॲक्शन मोडमध्ये दिसतोय. त्याचा हा अंदाज बघून चाहते क्रेझी झाले आहेत.ऐसी एक दुनिया जहां आतंक का है राज, वहां गणपत आ रहा है बनके अपने लोगों की आवाज.... या डायलॉगने टीझरची सुरूवात होते. टायगरची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

हा चित्रपट यावर्षी 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. गणपत येतोय रे..., किती दिवसांपासून प्रतीक्षा करत होतो, आता खरा धमाका होणार, ये तो बवाल है, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. ‘गणपत’चा टीझर सोशल मीडियावर हिट झाला आहे. तीनच तासांत ३ लाखांवर लोकांनी हा टीझर पाहिला.

हा गणपत चित्रपटाचा हा पहिला भाग असेल. गणपत १ ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा दुसरा भागही येत्या काळात पाहायला मिळणार आहे. टायगरसोबत या चित्रपटात क्रिती सॅनॉन लीड भूमिकेत आहे. अमिताभ बच्चन यांचीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ‘गणपत’शिवाय ‘बड़े मियां छोटे मियां’ या सिनेमातही तो झळकणार आहे. यात तो अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

टॅग्स :टायगर श्रॉफबॉलिवूडअमिताभ बच्चनक्रिती सनॉन