Join us  

Tiger Shroff : टायगर श्रॉफ देणार Danceचे धडे, सुरू केली अ‍ॅकडमी! नाव ठेवलंय खूपच खा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 6:44 PM

टायगर श्रॉफच्या डान्सने लोकांना त्याच्या प्रेमात पाडलं आहे.

Tiger Shroff : आपल्या डान्स आणि खतरनाक स्टंट्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ.  टायगर श्रॉफ केवळ त्याच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठीच ओळखला जात नाही, तर त्याने अनेकदा त्याच्या डान्सने चाहत्यांना वेड लावलं आहे. 'व्हिसल बजा', 'जय जय शिवशंकर' ते 'मस्त मलंग झूम'पर्यंत टायगर श्रॉफच्या डान्सने लोकांना त्याच्या प्रेमात पाडलं. त्याच्या डान्स मुव्ह्जचे अनेक दिवाने आहेत. जर तुम्हालाही त्याच्यासारखा डान्स शिकायचा असेल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

खुद्द टायगर श्रॉफ याने स्वतःची पहिली Dance अकादमी सुरू केली आहे.  'मॅट्रिक्स डान्स अकादमी' (Matrix Dance Academy) असं तिच नाव आहे.  'मॅट्रिक्स डान्स अकादमी' च्या माध्यमातून टायगर श्रॉफने जॅझ, हिप-हॉप, बॅले आणि इतर अशा विविध नृत्याचे सार देशभरात पसरवणार आहे. महत्त्वाकांक्षी कलाकारांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षक, तज्ञ मार्गदर्शन आणि रंगमंचावर चमकण्याची संधी देणे हे टायगर श्रॉफचे उद्दिष्ट आहे.

 वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'बागी ४'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वीच त्याचा 'बडे मियाँ छोटा मियाँ' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण, हा सिनेमा म्हणावी तेवढी कामगिरी बॉक्स ऑफिसवर करु शकला नाही. तर त्याआधी प्रदर्शित झालेला 'गणपत' चित्रपट सुपरफ्लॉप झाला होता. त्यामुळं त्याच्या  'बागी ४' या सिनेमाकडून चाहत्यांना खूप आशा आहेत.

टॅग्स :टायगर श्रॉफनृत्यसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा