‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून टायगर दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सन याला ट्रिब्यूट देणार आहे. टायगर मायकल जॅक्सनचा जबरदस्त फॅन असून, चित्रपटात त्याने स्ट्रीट डान्सरची भूमिका साकारली आहे. लहानपणी रस्त्यावर डान्स करून पैसे कमाविणारा मुलगा एक दिवस नॅशनल डान्स कॉम्पिटीशनमध्ये सहभागी होतो. पुढे तो एक चांगला डान्सर बनतो, अशीच काहीशी चित्रपटाची कथा आहे. ‘मुन्ना मायकल’चे दिग्दर्शक साबिर खान आणि टायगर श्रॉफ या चित्रपटाच्या माध्यमातून तिसºयांदा एकत्र येणार आहेत. हा चित्रपट २१ जुलै रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी हाही जबरदस्त भूमिकेत बघावयास मिळणार आहे. टायगर झोपडपट्टीत राहणाºया एका मुलाची भूमिका साकारणार आहे. टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांनीही झोपडपट्टीत जीवन व्यतीत केले आहे. त्यामुळे टायगरने हा चित्रपट त्याच्या वडिलांना समर्पित केला आहे.}}}} ">Celebrating Super Sunday with the Men In Blue. Join me as India takes on South Africa today! @StarSportsIndiapic.twitter.com/S7zSZkgvOx— Tiger Shroff (@iTIGERSHROFF) June 11, 2017
टायगर श्रॉफने ‘करो या मरो’ मॅचमध्ये केले ‘मुन्ना मायकल’चे प्रमोशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2017 2:56 PM
बॉलिवूड कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कुठलीच कसर सोडू इच्छित नाहीत. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्राफीतही काही कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना बघावयास मिळत आहेत.
बॉलिवूड कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कुठलीच कसर सोडू इच्छित नाहीत. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्राफीतही काही कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना बघावयास मिळत आहेत. मग यामध्ये टायगर श्रॉफ कसा मागे राहू शकतो? रविवारी भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या मॅचदरम्यान टायगरने त्याच्या आगामी ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. या अगोदर भारत-न्यूझीलंडदरम्यान झालेल्या अभ्यास मॅचमध्ये अक्षयकुमार याने त्याच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याने कपिल देव यांच्याबरोबर धमाकेदार कॉमेंट्री केली होती. ही मॅच भारताने जिंकली होती. आता टायगरनेही या संधीचा फायदा घेतला असून, त्याच्या आगामी ‘मुन्ना मायकल’च्या प्रमोशनसाठी तो मॅचस्थळी पोहोचला होता. या चित्रपटात टायगरबरोबर नवाजुद्दीन सिद्दिकी आणि निधी अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.