बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिरोपंती’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘बाघी’, ‘वॉर’, ‘फ्लाईंग जॅट’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटांत तो झळकला. काही वर्षांपूर्वी टायगरने हनुमानाची भूमिका साकारण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
टायगरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. २०१७ मधील म्हणजेच जवळपास सहा वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. ‘स्पायडरमॅन : होमकमिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा टायगरचा व्हिडिओमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये टायगरने हनुमानाची भूमिका साकारायला आवडेल, असं विधान केलं होतं. या इव्हेंटमध्ये टागरला “कोणत्या सुपरहिरोची भूमिका साकारायला आवडेल?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर टायगरने “बॉलिवूडमध्ये महाभारतावर चित्रपट बनला तर मला हनुमानाची भूमिका साकारायला आवडेल,” असं उत्तर दिलं होतं.
“इन्स्टा ब्लू टिक कितीला विकत घेतली?” विचारणाऱ्याला विशाखाचं उत्तर, म्हणाली, “गीतेवर हात ठेवून..."
एका इन्स्टाग्राम पेजवरुन टायगरचा हा जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी टायगरची खिल्ली उडवली आहे. “महाभारतात हनुमान होते. पण, ते अर्जुनच्या रथावर बसले होते,” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “तुला अर्जुनच्या रथावर बसण्याचा रोल हवाय का?” अशी कमेंटही केली आहे. “महाभारतात थोड्यावेळासाठी हनुमानजी होते. त्या पाच मिनिटांपेक्षा जास्त अभिनय करता येणार नाही, हे त्याला माहीत आहे,” असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे.
टायगर आधी सोनाक्षी सिन्हालाही ‘रामायण’बाबत दिलेल्या एका उत्तरामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. कौन बनेगा करोडपतीमध्ये सोनाक्षीने “हनुमान कोणासाठी संजीवनी आणायला गेले होते?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आधी तिने सीता माता आणि नंतर श्रीराम असं उत्तर दिलं होतं. सोनाक्षीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.