Join us

दिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 4:16 PM

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिला तिच्या हॉटनेससाठी ओळखले जाते. नेहमीच ती तिचे हॉट फोटो शेअर करीत असते. यावेळेसदेखील तिने ...

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिला तिच्या हॉटनेससाठी ओळखले जाते. नेहमीच ती तिचे हॉट फोटो शेअर करीत असते. यावेळेसदेखील तिने काहीसा असाच फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. दिशाने एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोमुळे सोशल मीडियावरील वातावरण तापले असून, चाहत्यांकडून त्यास तुफान लाइक्स मिळत आहेत. विशेष म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफच्या मम्मीनेही दिशाच्या या फोटोला कॉमेण्ट दिली आहे. दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांच्यातील नाते कधीच लपून राहिले नाही. भलेही दोघांनी आतापर्यंत मीडियासमोर याबाबतचा जाहीर खुलासा केला नसला तरी, दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत यात काही शंका नाही. कारण या दोघांना जेव्हा-जेव्हा एकमेकांविषयी विचारले गेले, तेव्हा त्यांच्या चेहºयांवरील स्माइलने सर्व काही सांगून दिले. त्यातच दिशाच्या या बिकिनी फोटोला चक्क टायगर श्रॉफची मम्मी आयशा श्रॉफने कॉमेण्ट दिल्याने दोघांच्या नात्याला तिने जणू काही संमती दिल्याचीच चर्चा रंगली आहे. काही वेळापूर्वीच आयशाने दिशाच्या बिकिनी फोटोला कॉमेण्ट देताना लव्हचे काही इमोजी शेअर करीत ‘वंडर वूमेन’ असे लिहिले आहे. आता तुमच्या लक्षात आलेच असेल की, आयशाला या कॉमेण्टच्या माध्यमातून नेमके काय सांगायचे आहे. टायगरच्या मम्मीची कॉमेण्ट बघताच दिशानेदेखील त्यास रिप्लाय दिला आहे. तिने हसण्याची काही इमोजी शेअर करीत या कॉमेण्टला रिप्लाय दिला आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी ‘बागी-२’ या सुपरहिट चित्रपटात एकत्र झळकले होते. त्यांच्या या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड केले. दोघांचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर टायगरची मम्मी आयशा दिशाला घेऊन डिनरलाही गेली होती. एकूणच असे दिसत आहे की, हळूहळू का होईना दिशा टायगरच्या परिवारातील सदस्यांची मने जिंकण्यात यशस्वी होताना दिसत आहे.