Join us

 टायगर श्रॉफचे खरे नाव आहे दुसरेच, ऐकून नेटकरीही चक्रावले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 3:30 PM

बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत नावालाही मोठे महत्त्व आहे. म्हणूनच अनेक नट-नट्यांनी बॉलिवूडमध्ये येताच आपले नाव बदलले. मोहम्मद युसूफ खानचे दिलीप कुमार झाले, राजीव भाटियाचे अक्षय कुमार झाले, अब्दुल राशीद सलीम सलमान खानचे सलमान खान झाले. ही यादी बरीच मोठी आहे.

ठळक मुद्देटायगरचे टायगर हे नाव कसे पडले, याचीही एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे.टायगरचे टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे.

बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत नावालाही मोठे महत्त्व आहे. म्हणूनच अनेक नट-नट्यांनी बॉलिवूडमध्ये येताच आपले नाव बदलले. मोहम्मद युसूफ खानचे दिलीप कुमार झाले, राजीव भाटियाचे अक्षय कुमार झाले, अब्दुल राशीद सलीम सलमान खानचे सलमान खान झाले, आलिया अडवाणीची कियारा अडवाणी झाली.  ही यादी बरीच मोठी आहे. सध्याचा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफ याचे खरे नावही वेगळेच आहे. होय, टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. अनेकांना हे कदाचित ठाऊक असावे. पण ज्यांना हे पहिल्यांदा कळते, त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यादरम्यान अनेक नेटीजन्सनी चित्रविचित्र प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.

टायगरचे टायगर हे नाव कसे पडले, याचीही एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे.टायगरचे टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे. होय, लहानपणी टायगरला चावायची सवय होती. तो सगळ्यांना चावत सुटायचा. जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते.

त्यांनी सांगितले होते की, त्याला ही सवय कशी पडली होती, मला ठाऊक नाही. तो सतत चावायचा. या सवयीसाठी त्याच्या आईने त्याला अनेकदा बदडले होते. तो जसा जसा मोठा झाला, तशी तशी त्याची ही सवय वाढली. घरी येणा-या पाहुण्यांनाही तो चावायचा. मग मीच त्याचे टायगर हे नाव ठेवले. टायगर व कृष्णा (टायगरची लहान बहीण) खूप खेळायचे. तितकेच भांडायचे. एकदा दोघांमध्ये इतके जोरदार भांडण झाले की, टायगरने कृष्णाला चावा घेतला. हा चावा इतका जोरदार होता की  तिला डॉक्टरकडे न्यावे लागले. यामुळे टायगरची आई इतकी संतापली की, तिने त्याला मिरची चाटवली. पुढे पुढे तो जेव्हाही चावायचा ती त्याला मिरची चाटवायची. मग मात्र टायगर घाबरू लागला आणि हळूहळू त्याची ती सवय मोडली. पण त्याचे टायगर हे नाव मात्र कायम राहिले.

टॅग्स :टायगर श्रॉफ