सिनेस्टार्सचं टॅटू प्रेम ही जगजाहीर आहे. सध्या टायगर श्रॉफची बहिण तिच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही. असं असलं तरी सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू आहे. कृष्णा श्रॉफही बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी. तिच्या टॅटूमुळे ती पुव्हा एकदा चर्चेत आली आहे. कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.
अगदी त्याचप्रमाणे कृष्णाची एक वेगळी स्टाइल आहे. त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे. पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
कृष्णाने तिच्या हातावर एक टॅटू गोंदवून घेतला आहे. कृष्णाला टॅटू खूप आवडतात म्हणून तिने शरीरावरील वेगवेगळ्या भागांवर कलरफुल टॅटू काढले आहेत. या टॅटूचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया पेजवरही शेअर केले आहेत. अवघ्या काही वेळातच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. हे फोटो पाहून तुम्हालाही तिचे टॅटू चे फोटो पाहून आश्चर्य वाटेल इतके तिने टॅटू गोंदवले आहेत. या प्रत्येक फोटोमध्ये कृष्णाचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहेत.
कृष्णा आपला भाऊ टागर प्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे. टॅटू फोटोप्रमाणेच ती तिचे वर्कआऊट व्हिडीओ शेअर करत असते. तसेच आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळेही ती सतत चर्चेत असते. कृष्णाला मित्रांबरोबर बाहेर फिरणे मजा मस्ती करायला खूप आवडते. टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनीसह ती अनेकवेळा लंच डेटवर जात असते. तसेच कृष्णाही सिनेइंडस्ट्रीपासून लांब असली तरी इन्स्टावर तिचे लाखो फॉलोव्हर्स आहेत. विविध अंदाजातीह फोटोमुळे कृष्णा नेटकऱ्यांना घायाळ करत असते.
कृष्णाला आतापर्यंत ब-याचशा चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या, परंतु तिला अभिनयात फारसा रस नसल्याने तिने या ऑफर्स नाकारल्या. कृष्णाने ट्रांसजेंडर कम्युनिटीवर आधारित एका डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शन केले आहे. एक वेबसाइटला मुलाखत देताना कृष्णाने तिच्या करिअरविषयी सांगितले. तिने म्हटले की, सुरुवातीला मी बॉलिवूडमध्ये येण्याचा विचार करत होते, परंतु नंतर माझ्या लक्षात आले की, मी यापेक्षाही चांगले काही करू शकते. मला फक्त बॉलिवूडमधील कामाचा अनुभव घ्यायचा होता, त्यामुळेच मी ‘मुन्ना मायकल’च्या निर्मात्यांबरोबर काम केले होते.