Join us

जॅकी भगनानीसोबत एक नाही तर दोन सिनेमे साइन केले टायगरने,मानधनाचा आकडा वाचून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 6:00 AM

टायगर श्रॉफ आगामी चित्रपट गणपतमुळे चर्चेत आहे. त्याचा या चित्रपटातील लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

टायगर श्रॉफने आपल्या डान्स आणि अ‍ॅक्शनच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. शेवटचा टायगर श्रॉफ बागी ३मध्ये झळकला होता. आता तो आगामी चित्रपट गणपतमुळे चर्चेत आला आहे. त्याचा या चित्रपटातील पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. त्याचे मोशन पोस्टर नोव्हेंबरमध्ये समोर आले होते. यात टाइगर दबंग अंदाजात दिसतो आहे.

असे वृत्त समोर येते आहे की, जी गणपत चित्रपटाशी निगडीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते जॅकी भगनानी गणपत चित्रपटासाठी टायगर श्रॉफला ५० कोटी रुपये मानधन दिले जात आहे.

विशेष बाब म्हणजे टायगरने दोन चित्रपट साइन केले आहेत. तो गणपतमध्ये दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी टायगरला साइन करण्यात आले आहे. या दोन्ही चित्रपटासाठी ५० कोटी मानधन मिळणार आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.

टायगर श्रॉफ गणपत शिवाय गणपत २मध्ये दिसणार आहे. तसेच हिरोपंतीचा सीक्वल येणार असल्याचेही समजते आहे. यात त्याच्यासोबत क्रिती सनॉन दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. पुढील वर्षी जुलैमध्ये चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त टायगर रॅम्बोमुळे चर्चेत आहे. मात्र हा चित्रपट अंडर प्रोडक्शन आहे. त्यामुळे या चित्रपट बनण्यासाठी अजून अवकाश आहे.

टॅग्स :टायगर श्रॉफ