Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : बहोत हार्ड...! Tik Tokची ही हॉट बाला जाणार ‘बिग बॉस’च्या घरात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 16:01 IST

येत्या सप्टेंबर महिन्यापासून टीव्हीवरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  त्यामुळे यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार याबद्दलची उत्सुकता पाहायला मिळतेय.

ठळक मुद्दे21 वर्षांची गरिमा पेशाने मॉडेल आहे. काही म्युझिक व्हिडीओमध्येही ती झळलेली आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यापासून टीव्हीवरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  त्यामुळे यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार याबद्दलची उत्सुकता पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांत ‘बिग बॉस’च्या घरात जाणा-या संभाव्य स्पर्धकांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.  त्यानुसार, यंदाच्या सीझनमध्ये चंकी पांडे, देबोलिना भट्टाचार्य, रामपाल यादव, माहिका शर्मा, मुग्धा गोडसे असे सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात जाणार आहेत. या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. होय,  प्रसिद्ध Tik Tok स्टार गरिमा चौरसिया ही सुद्धा ‘बिग बॉस’च्या घरात जाणार असल्याची चर्चा आहे.

Tik Tok फॉलो करणा-यांसाठी गरिमा चौरसिया हे नाव नवे नाही. ती Tik Tokवर प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. काही महिन्यांपूर्वी गरिमा अचानक चर्चेत आली होती. याचे कारण म्हणजे, तिने Tik Tokवर ‘बहोत हार्ड’ या लोकप्रिय रॅप साँगवर व्हिडीओ अपलोड केला होता. तिच्या या व्हिडीओची प्रचंड चर्चा झाली होती.

21 वर्षांची गरिमा पेशाने मॉडेल आहे. काही म्युझिक व्हिडीओमध्येही ती झळलेली आहे. इन्स्टाग्रामवरही ती लोकप्रिय आहे. तिचा ड्रेसिंग सेन्स आणि अदा बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवणा-या आहेत.

तिच्या याच अदांवर चाहते भाळतात. हीच गरिमा आता ‘बिग बॉस’चे घर गाजवणार असे मानले जात आहे. अर्थात गरिमाने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

यावेळी ‘बिग बॉस 13’ची प्राइज मनी 50 लाखांवरून वाढून थेट 1 कोटी झाली आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, या सीझनमध्ये दिग्गज सेलिब्रिटी यावेत, हा यामागचा उद्देश आहे. केवळ 50 लाखांच्या प्राइज मनी साठी अनेक मोठे सेलिब्रिटी या शोमध्ये येण्यास उत्सूक नसत. त्यामुळे मेकर्सनी ‘बिग बॉस 13’ची प्राइज मनी वाढवून 1 कोटी रुपये केल्याचे कळतेय. याशिवाय या बक्षिसाच्या रकमेबद्दल आणखी एक माहिती आहे. बक्षिसाच्या या रकमेतील अधिकाधिक रक्कम कमी व्हावी, या उद्देशाने प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांना एक टास्क खेळवला जाई. यंदाच्या सीझनमध्ये असा कुठलाही टास्क नसेल, असे कळतेय. 

तूर्तास हा शो होस्ट करण्यासाठी सलमानने घेतलेल्या मानधनाचीही जोरात चर्चा आहे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हा शो होस्ट करण्यासाठी सलमान सुमारे 400 कोटी रुपए घेणार आहे.  सलमान या टीव्ही शोला चौथ्या सीझनपासून होस्ट करतोय. या शोच्या एका वीकेंडसाठी म्हणजे शनिवार-रविवारच्या दोन एपिसोडसाठी सलमान 31 कोटी रुपए मानधन घेणार आहे. शोमध्ये 13 वीकेंड असणार. या हिशेबाने ही रक्कम 403 कोटींच्या घरात जाते. अद्याप या वृत्तालाकुठलाही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

टॅग्स :बिग बॉसटिक-टॉक