टिकटॉक स्टार आमिर सिद्दीकी आणि फैजल सिद्दीकी बऱ्याच कालावधीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. फैजलवर हिंसा वाढवणारे व्हिडिओज बनवण्याचा आरोप लागला होता त्यानंतर त्याचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा भाऊ आमिर सिद्दीकीचेही अकाउंटदेखील सस्पेंड करण्यात आले होते. मात्र आता आमिर सिद्दीकीचे अकाउंट पुन्हा एक्टिव्हेट करण्यात आले आहे. मात्र आता तो त्याचं अकाउंट वापर नसल्याचे समजते आहे. ही माहिती खुद्द त्यानेच एका मुलाखतीत दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आमिर सिद्दीकीने सांगितले की, हो माझे अकाउंट रिएक्टिव्ह झाले आहे. पण मी आता ते तोपर्यंत वापरणार नाही जोपर्यंत माझा भाऊ फैजल सिद्दीकीचे अकाउंट रिएक्टिव्ह होत नाही. आम्ही कायदेशीर लढाई लढू कारणा आम्हाला माहित आहे की आम्ही चुकीचे नाही. आम्ही आमचे सत्य सिद्ध करून दाखवू. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी मॅनेजमेंट टीम लवकरच यासंदर्भात एक प्रेस रिलीज जारी करणार आहे.
आमिर पुढे म्हणाला की, या सगळ्यामागे कोण आहे, हे मला माहित नाही, ते लोक माझ्या भावाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोक आमचे जुने व्हिडिओ क्रॉप करून त्यांना वाटतंय तसे एडिट करत आहे. जेणेकरून चुकीचा मेसेज जाईल आणि आमच्यावर खोटे आरोप लावले आहेत.
काही दिवसांपूर्वी टिकटॉक व्हर्सेस युट्यूब असे सोशल मीडियावर वाद रंगला होता. त्यानंतर फैजल सिद्दीकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात तो मुलीच्या चेहऱ्यावर काही तरी फेकताना दिसत होता. त्यानंतर फैजलवर एसिड अटॅकला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर सोशल मीडियावर खूप व्हिडिओ व्हायरल झाले.
त्यानंतर फैजल व आमिर सिद्दीकी वादात अडकले. कास्टिंग डिरेक्टर नूर सिद्दीकीने आमिरच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.