TikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 04:21 PM2020-05-29T16:21:54+5:302020-05-29T16:22:23+5:30

युट्यूब व्हर्सेस टिकटॉकच्या वादामुळे टिकटॉकच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण झाली होती.

TikTok's rating rises from 1.2 stars to 4.4 stars TJL | TikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज

TikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज

googlenewsNext

गुगलने टिकटॉक अॅपचे प्ले स्टोअरवरील 80 लाखांहून जास्त निगेटिव्ह रिव्ह्यूज हटविले आहेत. त्यामुळे या अॅपची रेटिंग 4.4 स्टारवर पोहचली आहे. चीनच्या या लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅपचे रेटिंग नुकतेच 4.7 स्टारवरून 1.2 स्टार झाले होते. यामागचे कारण होते युट्यूब व्हर्सेस टिकटॉक वाद. मोठ्या संख्येने युजर्स या अॅपला प्ले स्टोअरवर 1 स्टार रेटिंग देत होते. सोबतच हे अॅप बंद करण्याची मागणी करत होते. या वादात अखेर गुगलला मध्यस्थी करावी लागली.


खरेतर काही युट्यूबरने टिकटॉक कॉन्टेंट व क्रिएटरची खिल्ली उडविणारा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यानंतर भारताचा लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटीनेदेखील टिकटॉक स्टारवर व्हिडिओ अपलोड केला जो खूप लोकप्रिय ठरला. मात्र हा व्हिडिओ युट्यूबने चॅनेलवरून हटविला.या घटनेनंतर युट्यूबच्या सपोर्टमध्ये बरेच लोक पुढे आले आणि टिकटॉकवर निगेटिव्ह रिव्ह्यूज देऊ लागले. जास्तीत जास्त 1 स्टार रिव्ह्यूज भारतातून दिले गेले होते. चीनच्या या अॅपचे जास्त युजर्स भारतातले आहेत.


जसेजसे 1 स्टार रिव्ह्यूज येत राहिले तसे टिकटॉकचे रेटिंग 4.7 स्टारवरून घटून 1.2 स्टारपर्यंत पोहचले.

गुगलच्या ही गोष्ट लक्षात आली की टिकटॉकची लोकप्रियता कमी करण्याच्या उद्देशाने असे रिव्ह्यूज देण्यात आले आहे. गुगल या रिव्ह्यूला बॉम्बिंग मानते आणि या रेटिंग्स व रिव्ह्यूजला चुकीचे मनात हटविण्यात आले.काही वेळेपर्यंत टिकटॉकवर 28 मिलियन रिव्ह्यूज होते जे घटले असून आता 20 मिलियन राहिले आहेत.

Web Title: TikTok's rating rises from 1.2 stars to 4.4 stars TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.