कोर्टाने दिलासा देताच मीशा शफीवर बिथरला पाकी अभिनेता अली जफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 11:44 AM2019-04-28T11:44:45+5:302019-04-28T11:46:55+5:30
बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ची ठिणगी पडण्याआधीच पाकिस्तानमध्ये ही आग धगधगत होती. पाकिस्तानी गायिका मीशा शफी हिने पाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप ठेवत, खळबळ निर्माण केली होती. तेव्हापासून हे प्रकरण पाकिस्तानच्या न्यायालयात सुरु होते.
बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ची ठिणगी पडण्याआधीच पाकिस्तानमध्ये ही आग धगधगत होती. पाकिस्तानी गायिका मीशा शफी हिने पाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप ठेवत, खळबळ निर्माण केली होती. तेव्हापासून हे प्रकरण पाकिस्तानच्या न्यायालयात सुरु होते. शनिवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अली जफरवरविरोधातील प्रकरण रद्दबातल ठरवले.
My statement and media talk outside session court in Lahore https://t.co/7E21xX7ViH#FaceTheCourtMeeshaShafipic.twitter.com/5YqfV1ILH6
— Ali Zafar (@AliZafarsays) April 27, 2019
न्यायालयाच्या या निर्णयानंतर अली जफरने ट्वीटरवर स्टेटमेंट जारी करत, मीशा शफीवर चांगलेच तोंडसुख घेतले. ‘मीशा शफीने माझ्यावर जे काही आरोप केले होते, ते सगळे न्यायालयाने फेटाळून लावले. तिने या प्रकरणात नुकसानभरपाई मागितली होती. तिच्या खोट्या आरोपांनी मला प्रचंड त्रास झाला आणि आता ती पळ काढू पाहतेय. सोशल मीडियावर माझ्याविरोधात आरोप करत, तिने मोहिम चालवली. तिच्या आरोपानंतर वर्षभर मी शांत राहिलो. याकाळात माझ्याविरोधात हजारो ट्वीट पोस्ट केले गेलेत. पण आता सगळे सत्य जगासमोर आले आहे. मी एफआयए (स्वतंत्र चौकशी समिती)ला विनंती करतो की, तिच्याविरोधात कडक कारवाई केली जावी. सगळ्यांनी माझ्यासोबत येऊन मीशाला कोर्टात उघडे पाडावे,’असे अली जफरने लिहिले आहे.
न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळी अली जफर हजर होता. पण मीशा शफी गैरहजर होती. यानंतर मीडियाशी बोलताना अली जफरने म्हटले की, मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. मी यामुळे तिच्यावर मानहानीचे प्रकरण दाखल केले आहे. माझे जे काही नुकसान झाले, तिने त्याची भरपाई द्यावी.
मीशाने सोशल मीडियावर अलीविरोधात मोहिम उघडली होती. मी माझ्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात पहिल्यांदा बोलतेय. लैंगिक शोषणासारख्या घटनांवर उघडपणे बोलणे सोपे नसते. पण आता मला शांत राहणे अशक्य आहे. माझे मन मला आणखी शांत राहण्याची परवानगी देत नाहीये. मी एकदा नाही तर अनेकदा लैंगिक शोषणाची बळी ठरले. मी तरूण होते किंवा पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीत नवखी होते, तेव्हा नाही तर मी एक सशक्त स्त्री म्हणून ओळखली जात असताना, परखड बोलण्यासाठी, स्वतंत्र विचारांसाठी ओळखली जात असताना, दोन मुलांची आई असताना,अली जफरने माझे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर मला प्रचंड मानसिक त्रासातून जावे लागले. माझ्या कुटुंबालाही मानसिक त्रास सहन करावा लागला. अलीसोबत मी काम केले आहे.स्टेजवर तो माझा सहकलाकार होता. पण त्याच्या वागण्याने मी हादरले. मी माझ्या या पोस्टद्वारे पाकिस्तानी मुलींना हेच सांगू इच्छिते की, शांत बसू नका. स्वत:वरच्या अशा अत्याचाराविरूद्ध आवाज उठवा, असे तिने म्हटले होते़