Join us

या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा, रजनीकांत यांचे होते गुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 4:24 PM

सिनेइंडस्ट्रीतल्या लोकांसाठी एक दु:खद बातमी आहे. देवदास कनवाला यांनी 2 ऑगस्टला अखेरचा श्वास घेतला. देवदास गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.

सिनेइंडस्ट्रीतल्या लोकांसाठी एक दु:खद बातमी आहे. तेलुगू  सिनेमातील अभिनेते आणि दिग्दर्शक राजीव कनवाला यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. देवदास कनवाला यांनी 2 ऑगस्टला अखेरचा श्वास घेतला. देवदास गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. देवदास यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.  

देवदास कनकाला यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली. सुरुवातीला त्यांनी नाटकांचे दिग्दर्शन केले, त्यानंतर ते सिनेमांकडे वळले. हैद्राबादमध्ये त्यांचे एक अॅक्टिंग स्कूलदेखील आहे. ज्याठिकाणी त्यांनी साऊथमधले दिग्गज अभिनेत्यांना अभिनयाचे प्रशिक्षण दिले. यात रजनीकांत, चिरंजीवी, राजीव प्रसाद सारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.   

देवदास कनकाला यांचा जन्म 30 जुलै 1945 साली झाला होता. देवदास कनकाला यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलाचे नाव राजीव कनकाला आहे तर मुलीचे नाव श्रीलक्ष्मी कनकाला आहे. राजीन कनकाला यांनी प्रसिद्ध टिव्ही अँकर सुमा यांच्यासोबत लग्न केले आहे.     

काही दिवसांपूर्वी साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री शोभा यांचा देखील रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. शोभा मगालु जानकी मालिकेत दिसल्या होता. देवळात जाताना त्यांचा दुर्वैदी मृत्यू झाला होता.   

टॅग्स :मृत्यू