Join us

माझ्यातील अभिनयगुण माझ्या आईने हेरले- तोरल रसपुत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 10:19 AM

तेव्हा मला जाणीव झाली की मी हे करू शकते. आज आता अभिनय हीच माझी कारकीर्द बनली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमानेच मला आज इथवर आणलं आहे.

‘जग जाननी माँ वैष्णोदेवी- कहानी माता रानी की’ या मालिकेने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळविली असून त्यांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या मालिकेत बालपणीच्या वैष्णवीची आई राणी समृध्दीची भूमिका साकारीत असलेल्या तोरल रसपुत्र हिच्यात लहानपणापासूनच एक गुण दडलेला होता. मात्र हा गुण तिच्या आईनेच हेरला. होय, तोरलच्या आईनेच तिच्यात दडलेल्या अभिनयगुणांना प्रथम हेरले होते.

लहानपणापासूनच तोरल रसपुत्र ही फार सक्रिय होती. शाळा आणि कॉलेजातील सर्व समारंभांमध्ये ती सहभागी होत असे. शाळेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे असो की नृत्यस्पर्धेत सहभागी व्हायचे असो, तोरलची आई तिच्यामागे भक्कम आधार म्हणून उभी राहात असे.

 

तोरलच्या मते, आपण अभिनेत्री व्हावे, असे तिला कधी वाटत नव्हते. ती सांगते, “मी अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवावी, असा माझ्या आईचाच आग्रह होता. तेव्हा मला जाणीव झाली की मी हे करू शकते. आज आता अभिनय हीच माझी कारकीर्द बनली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमानेच मला आज इथवर आणलं आहे. प्रेक्षकांचं माझ्यावरील हे प्रेम असंच पुढेही कायम राहील, अशी मी आशा करते, ज्यामुळे मला माझी प्रत्येक भूमिका अधिकाधिक उत्तमपणे साकार करता येईल.”