Join us

Watch Video : ‘टोटल धमाल’च्या गाण्याचा ‘धमाल’ मेकिंग व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 11:00 IST

अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ प्रदर्शनापूर्वीच ‘धमाल’ करतोय. होय, सोशल मीडियाचा सध्या या चित्रपटाच्या व्हिडिओ व फोटोंनी धूम केली आहे. या चित्रपटाच्या गाण्याचा एक मेकिंग व्हिडीओ सुद्धा वेगाने व्हायरल होतोय.

ठळक मुद्देटोटल धमाल’हा सिनेमा ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे.

अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ प्रदर्शनापूर्वीच ‘धमाल’ करतोय. होय, सोशल मीडियाचा सध्या या चित्रपटाच्या व्हिडिओ व फोटोंनी धूम केली आहे. या चित्रपटाच्या गाण्याचा एक मेकिंग व्हिडीओ सुद्धा वेगाने व्हायरल होतोय.याच महिन्यात २२ फेबु्रवारीला हा अजयचा हा ‘धमाल’ चित्रपट रिलीज होतोय. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर व अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. यापैकीच एक गाणे म्हणजे, ‘पैसा ये पैसा’. या गाण्यात ‘टोटल धमाल’च्या अख्ख्या टीमने धमाकेदार परफॉर्मन्स केला आहे. पण हे काही मिनिटांचे गाणे तयार करण्यासाठी या टीमला किती कष्ट करावे लागलेत, हे तुम्हाला ठाऊक आहे? नसेल तर या गाण्याचा हा मेकिंग व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. खुद्द अजयने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या चित्रपटात अजय देवगणशिवाय माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर आदी कलाकार आहेत. 

‘टोटल धमाल’हा सिनेमा ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा सिनेमा ‘डबल धमाल’ होता. ‘टोटल धमाल’च्या निमित्ताने अनिल आणि माधुरी दीक्षित जवळपास 26 वर्षांनंतर एकत्र शूट करतायेत. ‘टोटल धमाल’मध्ये माधुरी आणि अनिल कपूर दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल कपूर यात अविनाश नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. 

टॅग्स :अजय देवगणरितेश देशमुख