Join us

‘मुंबई डायरीज २६/११’ मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 8:12 PM

‘मुंबई डायरीज २६/११’च्या ट्रेलरचे अनावरण नुकतेच गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या 'साहस को सलाम' या दिमाखदार सोहळ्यात केले.

अमेझॉन प्राईम व्हिडिओने २६/११ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काल्पनिक वैद्यकीय ड्रामावर आधारीत असलेली सीरिज ‘मुंबई डायरीज २६/११’च्या ट्रेलरचे अनावरण नुकतेच गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या 'साहस को सलाम' या दिमाखदार सोहळ्यात केले. या कार्यक्रमात, डॉक्टर्स आणि पोलिस कर्मचारी यांच्यासारख्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या शौर्य, निष्ठा आणि नि:स्वार्थी बलिदानाप्रती आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमेझॉन इंडिया ओरिजिनलच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, दिग्दर्शक निखिल अडवाणी, निर्माते आणि मालिकेतील कलाकार यांच्या सहउपस्थितीत मुंबईच्या अत्यावश्यक सेवेतील नायकांच्या अमूल्य बलिदानाच्या स्मृती जागवणारा ‘साहस को सलाम’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

मुंबई डायरीज २६/११ हे काल्पनिक रोमांचक वैद्यकीय नाट्य असून ते २६/११च्या भीतीदायक, अविस्मरणीय रात्रीला अधोरेखित करते, जिने एकीकडे शहर उद्धवस्त केले परंतु दुसरीकडे आपल्या लोकांची एकजूट केली आणि कोणत्याही संकटात मजबुतीने उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला. ही मालिका अशा घटनांचा लेखाजोखा मांडते ज्या सरकारी रूग्णालयात घडतात आणि रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी तसेच आणीबाणीच्या प्रसंगाला आणि आव्हानांना उलगडून दाखवते. ‘मुंबई डायरीज २६/११’ हा शो ९ सप्टेंबर २०२१ रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. 

 निखिल अडवाणी दिग्दर्शित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस यांनी सहदिग्दर्शित केलेली मुंबई डायरीज २६/११ हा शो, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या अप्रकाशित कथा सादर करते.

या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेकोंकणा सेन शर्मा