Join us

हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:52 IST

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या भूतनी सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर अल्पावधीत व्हायरल झालाय (sanjay dutt)

बॉलिवूडमध्ये सध्या विविध विषयांवरील सिनेमे येत आहेत. इतकंच नव्हे बॉलिवूडमध्ये हॉरर कॉमेडी सिनेमेही चांगलेच गाजत आहेत. मुंज्या, स्त्री २ या सिनेमांचं उदाहरण सर्वांसमोर आहे. अशातच बॉलिवूडमध्ये एका नव्या हॉरर कॉमेडी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमात सुपरस्टार संजय दत्त खास भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे भूतनी. नुकतंच भूतनी सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज झालाय.

भूतनी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काय

भूतनी सिनेमाच्या ट्रेलरमधून संजय दत्त एका पॉवरफूल अवतारात सर्वांसमोर येतोय.ट्रेलरमधून कथेचा अंदाज येत नसला तरीही सिनेमाची कास्ट भन्नाट आहे. सिनेमात संजय दत्त प्रमुख भूमिकेत असून त्यासोबत पलक तिवारी, आसिफ खान, मौनी रॉय, सनी सिंग हे कलाकार खास भूमिकेत आहेत. या सिनेमाची विशेष गोष्ट म्हणजे प्रसिद्ध सोशल मिडिया स्टार बी युनिक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

या तारखेला रिलीज होणार भूतनी सिनेमा

हॉरर कॉमेडी असलेला भूतनी सिनेमा १८ एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट आणि थ्री डायमेन्शन मोशन पिक्चर्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे.दीपक मुकुट यांच्यासह संजय दत्त स्वतः या सिनेमाचा सहनिर्माता आहे. हुनर मुकुट आणि संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांचंही निर्मात्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे. एकूणच अनेक दिवसांनी संजूबाबाचा कॉमेडी अवतार पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतील यात शंका नाही.

टॅग्स :संजय दत्तमौनी राॅयबॉलिवूडपलक तिवारी