अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगणही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. न्यासाला फारसे लाईमलाईटमध्ये राहायला आवडत नसले तरीही या ना त्या कारणामुळे मीडियाची नजर तिच्यावर पडते आणि ती चर्चेत येते. तिचे फोटो सोशल मीडियावर येताच नेटीझन्सच्याही नजरा तिच्यावर खिळतात. एरव्ही लोक तिच्या लूक्समुळे तिच्यावर कमेंट्स करताना दिसायचे.
आता तिच लोकं तिचे तोंडभरुन कौतुक करताना दिसतात. कारण न्यासाला अनेकदा तिच्या दिसण्यामुळे ट्रोल केले गेले होते. त्यामुळे न्यासाने तिच्या लूक्सवर मेहनत घेत ग्लॅमरस लूक मिळवला आहे. तिच्या झालेला कायापालट बघून नेटीझन्सदेखील आश्चर्य व्यक्त करत आहेत. आता कमालीची सुंदर ती दिसते. इतकेच नसून फॅशनच्या बाबतीतही ती आता सजग झाली आहे.
त्यामुळे कधी आणि कुठे कशारितीने स्टाइल करावी न्यासा उत्तम जाणते. एरव्ही सोशल मीडियापासून दूर पळणारी न्यासा आता मोठ्या आत्मविश्वासाने स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे. तिच्या गेल्या काही महिन्यांत पोस्ट केलेल्या फोटोंवरुन तसेच जुन्या आणि आताच्या फोटोवरुन तिच्यात झालेला बदल सहज कळेल.
या सगळ्या फोटोंमध्ये न्यासाचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर न्यासाने शेअर केलेत. तिचा मॉडर्न अंदाज नेटीझन्सनाही तितकाच भावतो आहे. तिचा हा मेकओव्हर, स्टायलिश दिसणे म्हणजे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याची चाहूल तर नाही ना अशा अनेक चर्चाही सध्या ऐकायला मिळत आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये काम करण्याची न्यासाची इच्छा नसल्याचंही अजय देवगणने अनेकदा सांगितले आहे. न्यासा सिंगापूरमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे. काजोल देखील न्यासाबरोबर सिंगापूरमध्ये राहत आहे.