'अॅनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या सातवे आसमाँ पर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 'अॅनिमल' नंतर तृप्तीला नवनवीन सिनेमाची ऑफर मिळतेय. त्यामुळे तृप्तीचा आनंद गगनात मावत असेल यात शंका नाही. नुकतंच तृप्तीच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. यावेळी तृप्तीची जोडी विकी कौशलसोबत जमणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'बॅड न्यूज'. आणखी वाचा या सिनेमाबद्दल.
तुम्हाला 'गुड न्यूज' सिनेमा आठवत असेलच. तोच अक्षय कुमार, दिलजीत दोसांज, करिना कपूर आणि कियारा अडवाणीचा. हा कॉमेडी सिनेमा चांगलाच हिट झाला. याच सिनेमाच्या निर्मात्यांनी 'बॅड न्यूज' या नवीन सिनेमाची घोषणा केलीय. "सर्वात मनोरंजक हंगामासाठी सज्ज व्हा - अनेक घटनांमधून एकदाच घडणारा असा प्रसंग.. खऱ्या घटनांनी प्रेरित कॉमेडी!" असं कॅप्शन देत बॅड न्यूजची घोषणा करण्यात आलीय.
या सिनेमात तृप्तीसोबत विकी कौशल आणि पंजाबी अभिनेता अॅमी वर्क झळकणार आहेत. सिनेमाची घोषणा करताना विकी-तृप्ती अन् अॅमीचा मजेशीर अंदाज बघायला मिळतो. हा सिनेमा १९ जुलै २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 'अॅनिमल' फेम तृप्ती 'भूल भूलैय्या'च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. 'भूल भूलैय्या' रिलीज व्हायच्या आधीच तृप्तीच्या पदरात 'बॅड न्यूज' सारखा बिग बजेट सिनेमा आला आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करतोय.