Join us

'मला फरक पडत नाही, मी माफी मागणार नाही'; मंसूर अली खानची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 10:03 AM

Mansoor ali khan : मंसूर अली खान याने अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री तृषा कृष्णन आणि मंसूर अली खान यांच्यात सुरु झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. मंसूर अली खानने तृषाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सध्या चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. तृषासह लियो सिनेमाचे दिग्दर्शक, साऊथमधील कलाकार यांनी मंसूर अली खान यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. इतंकच नाही तर या प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) घेतली आहे. परंतु, हे प्रकरण इतकं तापलेलं असतानाही मंसूर अली खान याने त्याची चूक अद्यापही कबूल केलेली नाही. इतकंच नाही तर त्याने काही झालं तरी तृषाची माफी मागणार नाही असं थेट सांगितलं आहे.

मंसूर अली खान याने तृषाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने मंसूर अली खानवर कारवाई केली. सोबतच तृषा कृष्णनवर असभ्य टिप्पणी केल्यामुळे तामिळनाडू पोलिसांना अभिनेत्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.  परंतु, या सगळ्यामुळे मला फरक पडत नाही असं त्याने म्हटलं आहे. मंसूर अली खानने एक पत्रकार परिषद घेत त्याची बाजू मांडली. सोबतच मी चूक केली नाही, मी माफी मागणार नाही", असंही म्हटलं आहे.

काय म्हणाला मंसूर अली खान?

"मी केलेलं वक्तव्य पर्सनली नव्हतं. मी कोणाला वैयक्तिकरित्या उद्देशून बोललेलो नव्हतो. जर सिनेमामध्ये मर्डर किंवा शारीरिक शोषण असे सीन दाखवले जात असतील तर ते खरे असतात का? याचा अर्थ खरंच प्रत्यक्षात ते शोषण केलं जातं का? खरंच एखाद्याचा खून केला जातो का? मला माफी मागायची गरज काय? मी काहीही चुकीचं  केलेलं नाही. मी प्रत्येक अभिनेत्रीचा आदर करतो, असं मंसूर अली खानने या पत्रकार परिषदेत म्हटलं.

'त्याच्यासारखे लोक...'; बेडरुम सीनविषयी बोलणाऱ्या अभिनेत्यावर तृषा कृष्णनने केली आगपाखड

नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेता मंसूर अली खान याला चित्रपटात तृषासोबत एक सीन करायचा होता. याविषयी त्याने त्याच्या व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. "जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचाय त्यावेळी मी मला वाटलं की हा एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी यापूर्वीही अनेक बलात्काराचे सीन शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही.  परंतु, काश्मीरमध्ये शूटिंग सुरु असताना मला तृषाला पाहायला सुद्धा दिलं नाही", असं मंसूर अली खान म्हणाला.

दरम्यान, मंसूर अली खान याचं व्यक्तव्य ऐकल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर, लियोचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा