बॉलिवूडचा संजूबाबा उर्फ संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तच्या बॉयफ्रेंडचं २ जुलै, २०१९ला निधन झालं. या घटनेनंतर त्रिशाला पूर्णपणे कोलमडून गेली. या दुःखातून सावरण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करते आहे. मात्र अद्याप ती यातून बाहेर पडू शकलेली नाही. तिने पुन्हा एकदा बॉयफ्रेंडच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
त्रिशाला दत्तने बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. या फोटोत त्रिशाला बॉयफ्रेंडसोबत बसलेली दिसते आहे. या फोटोत दोघेही क्युट दिसत आहेत. तिने फोटो शेअर करून लिहिलं की, आय लव यू, आय मिस यू.
बॉयफ्रेन्डसोबतचा एक फोटो शेअर करत तिने याबाबतचे संकेत दिले होते.
‘ एका इटालियनला डेट करणे म्हणजे, खूप सारा पास्ता आणि वाईन,’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते.