Join us

Troll: आलिया भट्टची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले.......

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 7:20 PM

नुकतीच आलिया भट्ट एयरपोर्टवर स्पाॅट झाली. तिचा हा एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. प्रत्येकवेळी बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके असल्याचे पाहायला मिळते.मात्र कधी कधी त्यांचाही ड्रेसिंग स्टाइलच्या आयडीयाची कल्पनाही चागंल्याच फसल्याचे पाहायला मिळते. असेच काहीसे झाले आहे आलिया भट्टविषयी. त्याला कारणीभूत ठरला तिचा हा खास फोटो. नुकतीच आलिया एयरपोर्टवर स्पाॅट झाली. तिचा हा एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या  फोटोला  पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव तर सोडाच तिची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळत आहे.  नेहमी सा-यांचे लक्ष वेधून घेणारी आलियाला यावेळी तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जात आहे. यावेळी आलियाने फ्लोरल ड्रेसिंग स्टाइल केल्याचे पाहायला मिळाले. मात्र तिचा हा ड्रेसिंग सेन्स पाहून  ''तिने नाइट सूट घातले आहे की काय'' अशी सोशल मीडियावर एका युजरने म्हटले आहे. तर दुस-या एका युजरने म्हटले आहे की, 'आलियाचा ड्रेसिंग सेन्स खूप खराब आहे'.

आलिया रणबीरच्या प्रेमात! अखेर महेश भट्ट यांनी दिली कबुली!!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहे. आलिया व रणबीर या दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. पण आलियाचे पापा महेश भट्ट यांनी मात्र सगळे काही कन्फर्म केले आहे. होय,  आलिया व रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली महेश भट्ट यांनी दिली आहे.

आलिया आणि रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. हे तुम्हीही समजू शकता. मला रणबीर आवडतो. तो व्यक्ति म्हणून खूप चांगला आहे. आता हे नाते कसे पुढे न्यायचे, हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्या दोघांचा आहे. ते लग्नासारख्या कुठल्या मुक्कामाला पोहोचू इच्छितात की आणखी काही, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. मी यावर बोलणारा, निर्णय देणारा कुणीही नाही. त्यांना आपले नाते पुढे त्यांना पूर्ण अधिकार आहे. आयुष्य आपल्या अटींवरचं जगायचे असते. त्यांचे नाते कुठल्या वळणावर जाते,याची आपण प्रतीक्षा करूया. तूर्तास तरी आपण केवळ प्रतीक्षा करू शकतो, असे महेश भट्ट या मुलाखतीत म्हणाले. 

टॅग्स :आलिया भट