युवराज सिंहची EX- वहिनीला केले ट्रोल,तर नेटीझन्स म्हणाले जनाची नाही तर मनाची तरी बाळगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 9:18 AM
'बिग बॉस-10' ची कंटेस्टेंट आणि क्रिकेटर युवराज सिंहची एक्स वहिणी अशी ओळख असलेली आकांक्षा शर्मा सध्या दिवसेंदिवस खूप चर्चेत ...
'बिग बॉस-10' ची कंटेस्टेंट आणि क्रिकेटर युवराज सिंहची एक्स वहिणी अशी ओळख असलेली आकांक्षा शर्मा सध्या दिवसेंदिवस खूप चर्चेत असते.खासजगी आयुष्यामध्ये होणा-या घडामोंडीमुळेच ती खूप चर्चेत आहे.कधी बोल्ड फोटोशूटमुळे तर कधी आणखी वेगळ्या कारणांमुळे आकांक्षा चर्चेत असते.तिच्या इंस्टाग्रामवर नजर टाकताच तुम्हाला तिच्या बोल्ड फोटोशूटने घायाळ केले तर नाही तरच नवल.सतत ती सोशल मीडियावर फोटोशूटचे काही फोटोज शेअर करत असते.मात्र आता आकांक्षाने एक वेगळाच फोटो शेअर करत पायावर दगड मारून घेतल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.चक्क सिगारेट ओढतानाचा फोटो आकांक्षाने शेअर केला आहे.हा फोटो पाहताच नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.फोटोमध्ये तिने व्हाइट अँड पिंक कलरचे आउटफिट आणि ट्रेडिशनल ज्वेलरी घातली आहे.काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत आकांक्षा एक धक्कादायक खुलासा केला होता.युवराज ड्रग्स घेतो,असा धक्कादायक खुलासाही केला होता.मी माझ्या नव-यासह ड्रग्स घ्यायचे.तेव्हा युवराजनेच मला त्यालाही ड्रग्स घेण्याची सवय असल्याचे सांगितले होते.इंडस्ट्रीमध्ये ड्रग्स घेणे ही कॉमन गोष्ट आहे,असे आकांक्षा म्हणाली होती .युवराजची आई म्हणजे स्वत:च्या सासूबाईवरही तिने अनेक आरोप केले होते.स्वत:च्या बचावाकरिता माझ्या सासूबाई काहीही बोलत आहेत,असे ती म्हणाली होती. स्वत:च्या अपयशी वैवाहिक आयुष्याविषयीही बोलताना सांगितले होते की, आमचा विवाह केवळ कागदोपत्री झाला होता.त्या नात्यात काहीच नव्हते.मी काहीच खोटं सांगितल नसून, मी काय बोलले आहे ते मला माहित आहे.माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर आता काहीही बोलणे योग्य नाही,असे तिने सांगितले होते.