अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटमधील स्टोरीवर इंग्लंड व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. यात तिने तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबतचा एक पण फोटो शेअर केलेला नाही. मात्र सॅमच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून समजते आहे की, ते दोघे एकत्र आहेत.
तृप्ती डिमरी आणि सॅम मर्चंटने इंस्टाग्राम स्टोरीवर सिंगल फोटो शेअर केले आहेत. पण त्यातील काही फोटोंचे लोकेशन सारखे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या दोघांच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील फोटो पाहून ते दोघे एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे बोलले जात आहे.
तृप्ती डिमरीने मुंबईतील वांद्रे भागात ख्रिसमस सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याची सुरुवात त्याने एका अप्रतिम बूमरँग व्हिडिओने केली. तिने ख्रिसमस ट्रीचा एक सुंदर फोटो शेअर केला, ज्यातून ती सुट्टीचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने गजबजलेल्या रस्त्यांचा एक फोटो देखील शेअर केला, ज्यामध्ये ती उत्सवाच्या वातावरणात मग्न होती. अभिनेत्रीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मजा करताना दिसत होती. तर दुसरीकडे सॅम मर्चंटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवरही असेच क्षण शेअर केले आहेत, जे स्पष्टपणे दर्शविते की ते एकत्र त्यांच्या सहलीचा आनंद घेत आहेत.
वर्कफ्रंट
तृप्ती डिमरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं कर 'बुलबुल' आणि 'कला'मध्ये दमदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीने गेल्या वर्षी रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवली. यानंतर ती अभिनेत्री ‘बॅड न्यूज’, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ आणि कार्तिक आर्यन स्टारर ‘भूल भुलैया ३’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.