Join us

सुशांतच्या बेडरूमच्या दरवाज्याचे कुलूप तोडणाऱ्याने सांगितले त्यावेळचे खरे वास्तव; कुलूप तोडले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 11:39 AM

सुशांत आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे ज्याने सुशांतच्या बेडरूमच्या दरवाजाचे लॉक तोडला त्याने तिथे काय घडले याचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला दोन महिने उलटले असून अद्याप त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या प्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार म्हणजे ज्याने सुशांतच्या बेडरूमच्या दरवाजाचे लॉक तोडला त्याने तिथे काय घडले याचा खुलासा केला आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत कुलूप तोडणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मला सिद्धार्थ पिटानीने माझा गुगलवरून नंबर मिळवत मला फोन केला होता त्याने मला फोनवर सांगितंल की, एक माणूस आहे जो घराच आतमध्ये झोपलेला आहे मात्र तो दरवाजा वाजवूनही उघडत नाही आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर येऊन दरवाजा खोलून द्या. त्यांनी मला पत्ता पाठवला आणि मी दिलेल्या पत्यावर गेलो. तिथे गेल्यावर मी फोन केला आणि विचारले कुठे यायचे आहे. तेव्हा त्यांनी मला सहाव्या मजल्यावर यायला सांगितले.

त्याने पुढे सांगितले की, मी घरात गेल्यावर त्यांनी मला वरती नेले कारण सुशांतचा फ्लॅट हा ड्यूप्लेक्स होता. मला त्यांनी लॉक दाखवले. ते लॉक हे कम्पूटराईस होते. मी माझ्या टूल बॉक्समधून मी चावी काढून खोलण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र ते लॉक कम्पूटराईस असल्यामुळे त्यांनी मी त्यांना सांगितले की हे लॉक तोडावे लागेल. मी हातोडी आणि स्क्रू डायवरने ते फोडत होतो तेव्हा जोरात आवाज होत होता तेव्हा तेथील सिद्धार्थ पिटानी आणि इतर लोक मला थांबवत होते. मला बोलायचे थांब आणि दरावाजाला कान लावून आवाज घ्यायचे मला बोलायचे फोड आता. मला त्यांनी सांगितले होते की आतून आवाज आला तर काम थांबवावे लागेल. अखेर लॉक तोडले, मला 7 ते 8 मिनिट लागली असावीत. लॉक तुटल्यावर मी हँडलने दरवाजा उघडायला गेलो तर त्यांनी मला थांबवले आणि बाजूला यायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला ठरल्याप्रमाणे 2000 रूपये दिले. मी नंतर निघून गेलो.

1 तासानंतर मला पोलिसांचा सिद्धार्थ यांच्या फोनवरून कॉल आला की तुम्ही आता जे लॉक खोलले तिथे परत या. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथे चार ते पाच जण होते. मला त्यांच्या हावभावावरून वाटत नाही की ही हत्या आहे. घरातील सर्वजण नॉर्मल होते. मला तिथे काहीही संशयास्पद असे काहीच वाटले नाही.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग