Join us

नशेत धुंद जॅकी श्रॉफने तब्बूसोबत जबरदस्ती करण्याचा केला होता प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 12:49 PM

अभिनेत्री तब्बू हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ९० च्या दशकात तब्बूची जोडी सनी देओल आणि अजय ...

अभिनेत्री तब्बू हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ९० च्या दशकात तब्बूची जोडी सनी देओल आणि अजय देवगणसोबत खूप पसंत केली जात होती. तब्बूलाही आज जबरदस्त अभिनय प्रतिभेसाठी ओळखले जाते. तब्बू सध्या ‘गोलमाल अगेन’मध्ये व्यस्त आहे. तर तिच्या पर्सनल लाइफविषयी सांगायचे झाल्यास तिच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त वळणे आली आहेत. त्यातीलच एक वादग्रस्त घटना बॉलिवूडचा जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ याच्याशी संबंधित आहे. ही घटना १९८६ मधील आहे. त्यावेळी जॅकी श्रॉफ तब्बूची मोठी बहीण फराहसोबत ‘दिलजला’ या चित्रपटाची शूटिंग करीत होते. त्यावेळी तब्बूदेखील या चित्रपटाची शूटिंग बघण्यासाठी सेटवर येत असे. चित्रपटात डॅनी खलनायकाच्या भूमिकेत होते. शूटिंग संपल्यानंतर सर्व स्टारची डॅनीच्या घरीच मैफल सजायची. एक दिवस जेव्हा फराह बहीण तब्बूला घेऊन डॅनीच्या घरी पोहोचली तेव्हा जॅकी श्रॉफचा अवतार बघून ती दंग राहिली. फराहने याबाबतचा उलगडा करताना माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, एक दिवस मी माझी बहीण तब्बूला घेऊन डॅनीच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी तिथे जॅकीही उपस्थित होते. त्याने खूप ड्रींक केली होती. नशेत धुंद असलेल्या जॅकीने त्यावेळी तब्बूसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. फराहने सांगितल्याप्रमाणे, जर डॅनीने योग्य वेळी मध्यस्थी केली नसती तर जॅकीकडून काहीही घडू शकले असते. हा खुलासा फराहने माध्यमांमध्ये या घटनेच्या दुसºया दिवशीच केला होता. त्यामुळे इंडस्ट्रीमधून तिच्यावर याबाबत दबाव आणण्यात आला होता. अनेकांनी तिला तिचे हे आरोप मागे घेण्याचा सल्ला दिला होता. कारण फराहच्या या आरोपामुळे संपूर्ण बॉलिवूड दंग राहिले होते.  अशातही फराहने तिचे आरोप मागे घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. पुढे तब्बूनेच माध्यमांमध्ये ‘मिस अंडरस्टॅण्डिंग’ झाल्याचे सांगत प्रकरण शांत केले. त्यानंतर तब्बूने तिच्या संपूर्ण करिअरमध्ये जॅकी श्रॉफसोबत काम केले नाही. एवढेच काय तर अवॉर्ड शोदरम्यानही हे दोघे एकमेकांशी बोलणे पसंत करीत नव्हते. आजही या दोघांमध्ये फारसे पटत नाही. एकमेकांना टाळण्याचा त्यांचा आजही प्रयत्न नसतो. वास्तविक तब्बूने कधीही जॅकी श्रॉफचा उघड विरोध केला नाही; परंतु वास्तवात ती जॅकी श्रॉफचा प्रचंड राग करीत असून, त्याच्यासोबत काम न करण्याची जणूकाही तिने शपथच घेतली आहे.