Join us  

'तुम बिन' सिनेमातील अभिनेता प्रियांशु चटर्जी आठतोय? आता त्याला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 12:15 PM

‘तुम बिन’ (Tum bin) हा सिनेमा पाहिला असेल तर प्रियांशुचा चेहरा तुम्हाला चटकन आठवले. प्रियांशुने बॉलिवूडमध्ये धमाकेदार सुरुवात केली खरी पण...

बाहेरून चकचकीत दिसणा-या ग्लॅमरच्या दुनियेत टिकणे सोपे नाही. येथे झगमगाट आहे, तितकाच अंधार. त्यामुळेच, जो टिकला तो येथे सुपरस्टार म्हणवला जातो आणि अंधारात गुडूप झालेल्यांना येथे ‘फ्लॉप’ म्हणून ओळखले जाते. असाच एक अभिनेता म्हणजे प्रियांशु चॅटर्जी(Priyanshu Chatterjee). ‘तुम बिन’ (Tum bin) हा सिनेमा पाहिला असेल तर प्रियांशुचा चेहरा तुम्हाला चटकन आठवले. प्रियांशुने बॉलिवूडमध्ये धमाकेदार सुरुवात केली. पण नंतर बॉलिवूडच्या अंधा-या गल्लीबोळात तो असा काही गुडूप झाला की, कदाचित चाहत्यांनाही त्याचा विसर पडला.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन’ या सिनेमाने प्रियांशू रातोरात स्टार झाला. मीडियात प्रियांशुच्या पर्सनल लाईफपासून प्रोफेशनल लाईफबद्दलची चर्चा रंगू लागली. पण यानंतर एकाही मोठ्या सिनेमात प्रियांशु दिसला नाही.

प्रियांशु चटर्जी ने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला होता. हे फोटो पाहून चाहत्यांना त्याला ओळखता आले नाही. या फोटोत प्रियांशु चॅटर्जी निळ्या शर्ट आणि जीन्समध्ये पोज देताना दिसत आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्याने 'पार्टी योगा' असे लिहिले आहे.

या फोटोमध्ये प्रियांशु पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो आहे. इतक्या वर्षात त्याच्या चेहऱ्यात बदल झाला आहे.  हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट केल्या आहेत - 'तुम बिन'चा हा तोच खरा अभिनेता आहे का? अनेक यूजर्सनी त्याला कमबॅकची विनंती केली आहे. 

अनुभव सिन्हांचा ‘तुम बिन’ हा सिनेमा 13 जुलै 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. यात प्रियांशु आणि सन्दली सिन्हाची रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. फिमेल फॅन्स तर प्रियांशुसाठी अक्षरश: वेड्या झाल्या होत्या. ‘तुम बिन’नंतर प्रियांशु ऐश्वर्या रायसोबत ‘दिल का रिश्ता’ या सिनेमात दिसला. पण या चित्रपटाचा प्रियांशुच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही. यानंतर काही चित्रपटांत तो दिसला. पण त्याचे सर्व सिनेमे धडाधड आपटलेत.

आज प्रियांशु कुठे आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तो आजही चित्रपटांत सक्रिय आहे. पण अगदीच छोट्या भूमिकांपर्यंत मर्यादीत झालाय. प्रियांशु सध्या मुंबईत राहतो. मॉडेलिंग व छोट्या मोठ्या भूमिकांमधून पैसा कमवतो.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी