Join us

'या' प्रसिद्ध दिग्दर्शकामुळे तुषार कपूर झाला सिंगल फादर; अभिनेत्याने केला अनेक गोष्टींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 12:11 PM

Tusshar kapoor: तुषार सध्या त्याच्या बॅचलर डॅड (Bachelor Dad) या पुस्तकामुळे चर्चेत येत आहे. या पुस्तकात त्याने त्याच्या सिंगल फादर होण्याचा प्रवास लिहिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (priyanka chopra) काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना एक गुडन्यूज दिली. प्रियांका आणि निक जोनास सरोगसी पद्धतीने आई-बाबा झाले आहेत. त्यामुळे सध्या या जोडीची सोशल मीडियावर चर्चा आहे. विशेष म्हणजे प्रियांकाने ही गोड बातमी शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर कलाविश्वातील सरोगसी पद्धतीने आई वा वडील झालेल्या कलाकारांची चर्चा होऊ लागली आहे. यामध्येच अभिनेता तुषार कपूरचीही (Tusshar Kapoor) चर्चा होत आहे. तुषार कपूर एक सिंगल फादर असून त्याने सरोगसी पद्धतीने वडील होण्याचा निर्णय कसा घेतला हे सांगितलं आहे.

तुषार सध्या त्याच्या बॅचलर डॅड (Bachelor Dad) या पुस्तकामुळे चर्चेत येत आहे. या पुस्तकात त्याने त्याच्या सिंगल फादर होण्याचा प्रवास लिहिला आहे. अलिकडेच या पुस्तकाच्या निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सिंगल फादर होण्याचा निर्णय कोणत्या व्यक्तीमुळे घेतला हे सांगितलं आहे.

"वयाच्या ३० व्या वर्षाच्या आसपास असताना मी सिंगल फादर होण्याचा निर्णय घेतला. माझ्या या पुस्तकात ९ ते १० वर्षांचा माझा प्रवास आहे. ज्यावेळी मी माझ्या भावी आयुष्याविषयी काही प्लॅन करत होतो. त्यावेळी मी मुलांविषयी विचार करत होतो. त्यावेळी तिरुपतीच्या एका ट्रिपमध्ये माझी भेट दिग्दर्शक, निर्माते प्रकाश झा यांच्यासोबत झाली. त्यांनी या भेटीत मला एक कल्पना दिली आणि त्यानंतर लक्ष्यचं(तुषारचा मुलगा) आमच्या घरात येण्याचा प्रवास सुरु झाला", असं तुषार म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "तुझं लग्न झालं नाहीये म्हणून काय झालं? जर तुझी इच्छा असेल तर तू एकल पालकत्व नक्कीच स्वीकारु शकतोस.  त्यानंतर त्यांनी माझी एका सिंगर पॅरेंटसोबत भेट घडवून दिली. या व्यक्तीने मला खूप मार्गदर्शन केलं. पण, मी एक चांगला पिता होऊ शकेन का? मी जे करतोय ते योग्य आहे का असे अनेक प्रश्न मला पडले होते. परंतु, त्याचा नीट विचार केल्यावर माझं मलाच उत्तर मिळालं. हो. मी चांगला पिता होऊ शकतो हे मला समजलं. त्यानंतर मी सिंगल पॅरेंट होण्याच्या निर्णयावर ठाम झालो".

दरम्यान, ज्यावेळी मी आयव्हीइएफची प्रोसेस सुरु केली त्यावेळी माझ्या कुटुंबीयांना सांगितलं. हा मुद्दा खूप सेंसिटिव्ह असल्यामुळे मी फार गुप्तता पाळली होती. पण, ज्यावेळी लक्ष्य घरात आला त्यावेळी सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं. विशेष म्हणजे तुषारने त्याचा हा सगळा प्रवास त्याच्या बॅचलर डॅड या पुस्तकात लिहिला आहे. लवकरच त्याचं हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा