तुषार कपूर नऊ महिन्यांच्या ‘लक्ष्य’ला सोबत घेऊन करणार ‘गोलमाल अगेन’ची शूटिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2017 1:25 PM
सरोगसी पद्धतीने गेल्या वर्षी एका मुलाचा बाप बनलेला अभिनेता तुषार कपूर याला मुलगा ‘लक्ष्य’ याची चिंता खूपच भेडसावत असते.
सरोगसी पद्धतीने गेल्या वर्षी एका मुलाचा बाप बनलेला अभिनेता तुषार कपूर याला मुलगा ‘लक्ष्य’ याची चिंता खूपच भेडसावत असते. तो त्याच्या मुलाप्रती एवढा सतर्क असतो की, आता त्याच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो नऊ महिन्यांच्या लक्ष्यला सोबत घेऊन जाण्याची तयारी करीत आहे. अविवाहित बाप असलेल्या तुषारनंतर दिग्दर्शक करण जोहर जुळ्या मुलांचा बाप बनला आहे. यावेळी तुषारने करणला शुभेच्छा देताना काही टिप्सही दिल्या. तुषार लवकरच त्याच्या आगामी ‘गोलमाल अगेन’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार असून, त्यासाठी तो लक्ष्यसाठी काही स्पेशल प्लान्स करण्याची तयारी करीत आहे. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, ‘गोलमाल अगेन’ या सिनेमाची शूटिंग येत्या ९ मार्चपासून सुरू होणार आहे. शूटिंगसाठी तुषारला तब्बल ४० दिवस हैदराबादला जावे लागणार आहे. मात्र तुषारला मुलापासून दूर जाणे असह्य असल्याने तो लक्ष्यला सोबत घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार नऊ महिन्यांच्या लक्ष्यने पहिला शब्द ‘पापा’ असा उच्चारला होता. त्यामुळे तुषार आपल्या मुलाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतो. शिवाय त्याचे हावभाव, त्याचा क्यूटनेस तो अजिबात मिस करू इच्छित नसल्यानेच तो लक्ष्यला सोबत घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. तुषारने डीएनएला सांगितले की, लक्ष्यपासून दूर राहाणे मला अजिबात शक्य नाही. लक्ष्यच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मी शूटिंगनिमित्त बाहेर पडणार आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेऊन जाऊ इच्छितो. मला माहीत आहे, त्यासाठी मला सकाळी ६ वाजता उठावे लागेल. त्यानंतर जीम अन् सरळ सेटवर पोहचावे लागेल. मात्र यासाठी मी तयार आहे. जेव्हा मी त्याला हैदराबादला घेऊन जाणार तेव्हा त्याच्यासाठी एक स्वतंत्र रूम घ्यावी लागणार आहे. जोपर्यंत त्याचे मन रमणार तोपर्यंत मी त्याच्यासोबत राहणार. जेव्हा त्याला एकटेपणा वाटेल तेव्हा मी माझ्या पॅरेंट्सला बोलावून घेईल. मग त्यांनी लक्ष्य पुन्हा घरी आणले तरी चिंता नाही, असेही त्याने सांगितले. पुढे बोलताना तुषारने सांगितले की, दहा तासांपेक्षा अधिक वेळ झाल्यास लक्ष्य मला मिस करायला लागतो. शिवाय मलाही त्याच्यापासून दूर राहाणे जमत नाही. नुकतेच हे बाप लेक दुबईला ट्रीपसाठी गेले होते. यावेळी तुषारची आई आणि त्याची बहीणही लक्ष्यसोबत होती. तुषारने नुकताच लक्ष्यचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्यामध्ये तो खूपच क्यूट दिसत आहे.