'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. लव्ह जिहादसारख्या सत्यघटनेवर आधारित या सिनेमाला अनेकांचा प्रतिसाद मिळतोय तर काही जणांनी तीव्र विरोधही केला आहे. सिनेमात अभिनेत्री अदा शर्माची मुख्य भूमिका आहे. तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होतंय. तर दुसरीकडे सिनेमातील खलनायिका 'आसिफा' म्हणजेच अभिनेत्री सोनिया बलानीनेही (Sonia Balani) लक्ष वेधून घेतलंय.
कोण आहे सोनिया बलानी?
अभिनेत्री सोनिया ही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'डिटेक्टिव्ह दीदी' नावाने ती घराघरात पोहोचली. सोनियाने 'बडे अच्छे लगते है', 'तू मेरा हिरो' या मालिकांमध्येही काम केलं आहे. याशिवाय तिने सैफ अली खानच्या 'बाजार' सिनेमातही भूमिका साकारली आहे. 'द केरळ स्टोरी' हा तिचा तिसरा सिनेमा आहे.
किती घेतलं मानधन?
विपुल शहा यांच्या 'द केरळ स्टोरी' या सिनेमात सोनियाने 'आसिफा' या खलनायिकेचं पात्र साकारलं आहे. हे पात्र सिनेमातील सर्वात जास्त निगेटिव्ह भूमिकांपैकी एक होतं. नर्सिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधील मुलींसोबतच आसिफा राहत असते. सोनियाने या भूमिकेसाठी सुमारे ३० लाख मानधन घेतल्याची चर्चा आहे.
सोनिया बलानीचा जन्म आग्रा येथे १९९१ साली झाला. गेल्या काही वर्षांपासून ती फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. तिने सुरवीन दुग्गल शोमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. सोनिया अभिनेत्रीशिवाय उत्तम डान्सर आणि फिटनेस फ्रिक आहे.