Join us

ट्विंकल खन्ना-अक्षयकुमारच्या वैवाहिक जीवनाला १६ वर्ष पूर्ण; यावरून सेक्सवर बोलली ट्विंकल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 12:34 PM

बॉलिवूडमध्ये घटस्फोटाचे सत्र सुरू असताना एक दाम्पत्य असेही आहे, जे गेल्या कित्येक वर्षांपासून सुखाने संसार करीत आहेत. त्यांच्या सुखी ...

बॉलिवूडमध्ये घटस्फोटाचे सत्र सुरू असताना एक दाम्पत्य असेही आहे, जे गेल्या कित्येक वर्षांपासून सुखाने संसार करीत आहेत. त्यांच्या सुखी संसारात कुठल्याही प्रकारची दरार निर्माण झाली नसून, जणू काही त्यांचे नाते दर दिवसाला घट्ट होत आहे. होय, आम्ही ट्विंकल खन्ना आणि अक्षयकुमार या दाम्पत्याविषयी बोलत आहोत. संसाराला १६ वर्ष झालेल्या ट्विंकलला जेव्हा अक्षयसोबतच्या नात्याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने दिलेले उत्तर खरोखरच वाखण्याजोगे होते. ट्विंकल म्हणाली की, ‘मी या टीमचा (अक्षय-ट्विंकल) एक भाग बनल्याने स्वत:ला भाग्यवान समजते, मला असे वाटते की आमची एक मजबूत टीम आहे, मी माझ्या संसारात खूश आहे’ असेही ट्विंकल म्हणाली. यावेळी ट्विंकलने तिच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. ती म्हणाली की, ‘आयुष्यात सेक्स महत्त्वाचा असतो, ज्या गोष्टीमुळे मला अक्षयप्रती आकर्षित केली ती वेळेनुसार बदलत गेली. त्यामुळे आमच्यातील नाते अधिकच घट्ट होत गेल्याचेही तिने यावेळी सांगितले. ट्विंकल अभिनेत्रीबरोबर प्रसिद्ध कॉलमिस्टदेखील आहे. आपल्या परखड लिखाणामुळे ती सदैव चर्चेत असते. शिवाय तिच्या लिखाणाची लोकांना आतुरता लागलेली असते. त्याचबरोबर ट्विंकल सध्या अक्षयच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटालाही प्रोड्यूस करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे या दोन अभिनेत्री दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, त्याचे काही फोटोज् रिलीज करण्यात आले आहे. फोटोंमध्ये अक्षय ज्या अवतारात दिसत आहे, त्यावरून चित्रपटाची कथा शिर्षकाप्रमाणेच भारदस्त असेल, असा कयास लावला जात आहे.