Join us

Video: ट्विंकल खन्नाने साजरा केला ५० वा वाढदिवस, अक्षय कुमारला अंडर वॉटर केलं Kiss

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 14:16 IST

ट्विंकल खन्नाने आपल्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला.

'खिलाडी' अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. ट्विंकल आपल्या कुटुंबासोबत वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करताना दिसत आहे. याची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये ती अंडर वॉटर स्वीमिंग करत असून सोबत अक्षय कुमारही आहे. ट्विंकल पाण्याच्या आतच अक्षयला किस करतानाही दिसत आहे.

ट्विंकल खन्नाने आपल्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती पती अक्षय कुमार आणि मुलं आरव-नितारासोबत स्विमिंग, स्नॉर्कलिंग करताना दिसत आहे. अंडर वॉटर स्विमिंग करताना समुद्रतळाचे दृश्य खूपच सुंदर दिसत आहेत. ट्विंकल समुद्रात अगजी तटाशी जाऊन समुद्री जीवन एक्सप्लोर करताना दिसत आहे. दरम्यान या व्हिडिओत ट्विंकल अक्षयला किस करतानाही दिसते. तिने लिहिले,'माझ्या 50 व्या वाढदिवशी, मी जेव्हा आजूबाजूचं जग आणि माझ्या कुटुंबाकडे पाहते तेव्हा माझे डोळे आणि मन भरुन येतं. लोक महान तत्वज्ञानींकडे आदर्श म्हणून पाहतात पण मी फाईंडिंग निमोच्या डोरीला फॉलो करते, आयुष्यात काहीही होवो ती डोरी फक्त पोहत राहायला सांगते. हे अॅडव्हेंचर कधीच थांबू नये'

ट्विंकल खन्नाच्या कामाविषयी सांगायचं तर ती सध्या तिच्या नवीन पुस्तकावर काम करत आहे. तिने अभिनयात पदार्पण करुन आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ती अक्षय कुमारसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर ट्विंकल लेखिका झाली.

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमारबॉलिवूडसोशल मीडिया