Join us

ट्विंकल खन्ना विसरली तिच्या लग्नाची तारीख.. मग झाले असे काही !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 9:16 AM

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची जोडी एक यशस्वी जोडी म्हणून ओळखली जाते. अक्षय कुमारचे टीनावर ...

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची जोडी एक यशस्वी जोडी म्हणून ओळखली जाते. अक्षय कुमारचे टीनावर म्हणजेच ट्विंकलवर भरपूर प्रेम आहे. पण इथे टीना त्यांच्या लग्नाची तारीख विसरली त्यामुळे अक्षय निराश झाला पण त्याने आपले तिच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी असे काही केले की टीनाला त्याचा अंदाज फारच आवडला.या जाहिरातीत अक्षय ट्विंकलला म्हणतो "हाय टीना" पण त्याच्या हाय ला ती दुर्लक्षित करत त्याला ती एक प्रश्न विचारते 'आपले लग्न कधी झाले होते २००१की २००२ ?" हे ऐकून अक्षय निराश होतो आणि विचार करतो की जेव्हा बायको लग्नाची तारीख विसरते आहे म्हणजे काहीतरी चुकतंय'तेव्हा अक्षय तिला एक सरप्राईज गिफ्ट देतो. गिफ्ट पाहून ट्विंकल फार खुश होते त्या गिफ्टमध्ये एक सुंदरसा हार असतो जो अक्षयने ट्विंकल साठी घेतला असतो, ट्विंकल मनात विचार करते "किती रोमँटिक गिफ्ट दिले ते पण प्राईज टॅग ना काढता" पण जशी ती प्राईज टॅग उलटी करून पहाते त्यावर त्यांच्या लग्नाची तारीख लिहिली असते "१७०२२००१" तेव्हा ट्विंकल च्या लक्षात येते की तिने अक्षय ला विचारले असते की आपल्या लग्नाची तारीख काय आहे? ती अक्षय जवळ जाते तेव्हा अक्षय तिला म्हणतो की " आवडले नसले तरी तू एक्सचेंज करु शकते." तेव्हा ट्विंकल त्याला यावर उत्तर देते काही गोष्टी एक्सचेंज नाही कराता येत. यादोघांनी एक ज्वेलरीच्या ब्रँडसाठी ही अॅड शूट केली आहे. सध्या अक्षय कुमार छोट्या पडद्यावर द ग्रेड इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये सुपरजजच्या भूमिकेत दिसतो आहे. यानंतर तो गोल्ड चित्रपटात झळकणार आहे.  हा चित्रपट भारतीय हॉकी संघाच्या ऑल्मिपिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. यात अक्षय कुमार भारतीय हॉकी संघाचे कोच बलबीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ALSO READ : ​​या अभिनेत्रीमुळे ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला दिला होता चोप