Join us

मानलं तुला..! ट्विंकल खन्नाने दिल्ली आणि पंजाबमध्ये पाठवले ऑक्सिजन कंसंट्रेटर, ट्विटरवर दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:02 AM

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने नुकतेच देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन सुमारे १०० ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्याचे ठरविले होते. अभिनेत्रीने दिलेले हे आश्वासन पूर्ण केले आहे.

अभिनेत्री ते लेखक असा प्रवास करणारी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने नुकतेच देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन सुमारे १०० ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्याचे ठरविले होते. अभिनेत्रीने दिलेले हे वचन पूर्ण केले आहे. ट्विंकलने सोशल मीडियावर पंजाब आणि दिल्लीत ऑक्सिजन कंसंट्रेटरचा तिसरा लॉट वितरित केल्याचे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी तिने दिल्लीत कोव्हिड १९ झालेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन कंसंट्रेटरची यशस्वी व्यवस्था केली होती. तिने आपल्या ट्विटमध्ये ज्या संघटनांचे आभार मानले आहेत ज्यांनी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

ट्विंकल खन्नाने ट्विटरवर सांगितले की ऑक्सिजन कंसंट्रेटरचा तिसरा लॉट तयार आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, आमचा तिसरा लॉट दिल्लीतील रुग्णांना वितरित केला जाणार आहे. तर तिने आणखीन एक फोटो शेअर करत लिहिले की, खालसा एडच्या मदतीने आणखी एक लॉट पंजाबमधील रुग्णांसाठी पाठवला जाणार आहे. 

ट्विंकल खन्नाने नुकतेच कोरोनाग्रस्तांसाठी २४० ऑक्सिजन कंसंट्रेटरचे वितरण केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली होती. तिने सांगितले होते की, एनजीओच्या मदतीने २५० ऑक्सिजन कंसंट्रेटर उपलब्ध केले आहे. त्यासोबतच तिने एक फोटोदेखील शेअर केला होता. तिने म्हटले होते की, मी दैविक फाउंडेशन आणि त्या सर्वांची आभारी आहे, ज्यांनी माझी मदत केली.

ट्विंकल खन्नाच्या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, तुम्ही खूप छान काम करत आहे. सध्या लोकांना मदतीची गरज आहे. आणखी एका युजरने म्हटले की, आम्ही एकत्रित येऊन या महारोगराईशी लढावे लागेल. एका युजरने ट्विंकलने कौतुक करत लिहिले की, तुम्ही नेहमीच लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेता. चांगले काम करत रहा.

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमारकोरोना वायरस बातम्याऑक्सिजन